पुणे : फिटनेस टॉक कार्यक्रमात मल्लेश धनगर यांना यंदाचा “ फेडरेशन रत्न” पुरस्कार तर बॉडीबिल्डिंग च्या प्रचार प्रसारासाठीचा “गुणवंत कार्यकर्ता पुरस्कार” ”श्री अविनाश बागवे” साहेब यांना देण्यात आला.
यामध्ये व्यायाममहर्षी श्री मधुकर तळवलकर, मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले, मिस्टर वर्ल्ड महेंद्र चव्हाण, मिस एशिया डॉ. मंजिरी भावसार, सेलिब्रिटी ट्रेनर राकेश उदियार, डॉ. प्रशांत मदने सहभागी झाले होते. यांची मुलाखत घेण्यासाठी खास दिल्लीवरून श्री. अविरल अगरवाल यांना आमंत्रित करण्यात आले होते.
फेडरेशन ऑफ बॉडिबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे
याप्रसंगी राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, फिटनेस क्षेत्रातील मान्यवर फेडरेशनचे पदाधिकारी तसेच सप्लिमेंट व इक्विपमेंट कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्या दरम्यान फिटनेस क्षेत्रात कार्यरत मनसे शारीरिक सेना पुणे शहर अध्यक्ष निलेश काळे व इतर सदस्यांचा फेडरेशन तर्फे सत्कार करण्यात आला.
बॉडिबिल्डरच्या आठवणी व पुढिल पिढीला प्रेरणादायी ठरावी यासाठी काढलेल्या मॅगझीनच्या द्वितीय आवृतीचे प्रकाशन व त्यांच्या यशोगाथेवरील व्हिडीओ आत्ता यू ट्युब च्या माध्यमातून घरोघरी पोहचाव्या म्हणून यू ट्युब चॅनलचे उद्घाटन श्री. तळवलकर सरांच्या हस्ते करण्यात आले.
अशा पध्दतीचे कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदी वातावरण होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेडरेशनचे सचिव श्री. दिलीप धुमाळ यांनी केले तर वायब्रस एंटरप्रायझेस चे संचालक श्री प्रसाद जायगुडे यांनी आभार मानले.