फिनोलेक्स पाईप्सच्या हृदयस्पर्शी रक्षाबंधन फिल्म मधून भाऊ बहिणीच्या नात्यातील सामर्थ्याचे दर्शन

18

पुणे, ऑगस्ट २०२३ : दीर्घकाळ टिकणाऱ्या पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्जची भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी फिनोलेक्स पाईप्स तर्फे रक्षाबंधनाच्या पवित्र सणासाठी म्हणून एक हृदयस्पर्शीआकर्षक लघुपट सादर करण्यात आला आहे. ही उत्कंठावर्धक फिल्म भावंडांमधील चिरस्थायी बंध सुंदरपणे मांडते आणि या सणाचे महत्त्व हृदयस्पर्शी पद्धतीने अधोरेखित करते. कॅम्पेन फॅक्टरी निर्मित आणि रिपुंजॉय ब्युम दिग्दर्शितया लघुपटात भावंडांमधील अतूट नातं साजरे करताना रक्षाबंधनाचे सार दर्शविण्यात आले आहे.

ही कथा एका प्लंबरची आहेतो त्याच्या एका क्लायंटला दीदी‘ म्हणत असतो. कथानक उलगडत असताना आपल्याला दिसते की काम करत असताना अचानक प्लंबरची राखी तुटतेत्यामुळे त्याला एकदम कसेनुसे व्हायला लागते. अनपेक्षितपणे तो ज्या क्लायंटला दीदी‘ म्हणून हाक मारत असतो ती दीदी’ प्लंबरला राखी बांधायची ठरविते. राखी बांधण्याची ही साधी सरळ पण प्रगल्भ कृती अर्थ आणि भावनेने समृद्ध आहे. नेहमीच्या सुरू असलेल्या सर्वसाधारण कामाचे  त्यातून एका हृदयस्पर्शी हावभावातकृतीत रूपांतर होते.

या फिल्मच्या वर्णनात्मक निवेदनातून फिनोलेक्स पाईप्सच्या अतूट वचनबद्धतेचे प्रतिबिंब प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि त्यातून दीर्घकाळ टिकणाऱ्या नातेसंबंधांचे मूल्य अधोरेखित होते. ही कलात्मकरीत्या तयार केलेली शॉर्ट फिल्म म्हणजे महत्त्वपूर्ण संबंधाना चालना देण्याच्या कंपनीच्या बांधिलकीची पावती म्हणून काम करते.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्सचे प्रमुख आणि उपाध्यक्ष श्रीअशोक जैस्वार या उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले, “फिनोलेक्स पाईप्समध्ये आम्ही आपल्या समाजाला एकत्र ठेवणारे दीर्घकाळ टिकणारे नातेसंबंध साजरे करण्यावर विश्वास ठेवतोही फिल्म म्हणजे केवळ चित्रणच नाही तर भावंडांमधील अतूट नातेसंबंधाचा दाखला आहे. आमच्या ऐक्यसामर्थ्य आणि जोडले जाण्याच्या मूल्यांशी हे पूर्णपणे जुळणारे आहे. आम्हाला आशा आहे की ही फिल्म प्रत्येक पिढीतल्या प्रेक्षकांना आपल्याशी जुळणारी वाटेल आणि या सणाच्या उत्सवादरम्यान भावंडांच्या दीर्घकाळ टिकणार्‍या नातेसंबंधाच्या महत्त्वाची प्रत्येकाला आठवण करून देईल.

आपल्या उत्पादन सादरीकरणामध्ये नावीन्यपूर्णता आणि गुणवत्तेसाठीच्या वचनबद्धतेच्या पलीकडे जाऊन फिनोलेक्स पाईप्सची बांधिलकी जीवनाला सखोल स्तरावर स्पर्श करणाऱ्या उपक्रमांपर्यंत विस्तारतेहा लघुपट कुटुंब आणि समाजामध्ये अर्थपूर्ण संबंध जोपासण्याच्या कंपनीच्या बांधिलकीचे एक झळाळते उदाहरण आहे.