नवी दिल्ली, ८ ऑगस्ट २०२३ – एसपी ब्रँडचा वारसा पुढे नेण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज एसपी १६० लाँच केली. ठळक, स्पोर्टी आणि स्टायलिश एसपी१६० रोजच्या प्रवासासाठी खास बनवण्यात आली असून सुधारित ताकद आणि कामगिरी ही तिची वैशिष्ट्ये आहेत.
लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘२०१५ मध्ये पर्दापण केल्यापासूनच एसपी ब्रँडने १२५ सीसी मोटरसायकल क्षेत्रात क्रांती घडवून आणली. तंत्रज्ञान, स्टाइल व कामगिरी या बाबतीत नवे मापदंड या ब्रँडने प्रस्थापित केले. एसपी ब्रँडचा हाच वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही अधिक दर्जेदार व आधुनिक एसपी १६० लाँच केली आहे. ही स्पोर्टी मोटरसायकल अत्याधुनिक इंजिनियरिंग आणि आधुनिक सर्जनशीलतेचे प्रतीक असून ती ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास वाटतो.’
नवी एसपी १६० लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘नवी एसपी१६० तरुण, महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आली असून स्पोर्टी रूप आणि उपयुक्तता यांचे अनोखे मिश्रण त्यात साधण्यात आले आहे. लक्षणीय मापदंड प्रस्थापित करणाऱ्या एसपी १६० मध्ये असामान्य कामगिरी, अनोखी इंधन क्षमता, एकसमान उर्जा वितरण आणि आरामदायीपणा ही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. उठावदार डिझाइन आणि आरामदायी वैशिष्ट्यांच्या मदतीने रायडर्सना लांबवरचा प्रवास अगदी सहजपणे करता येतो.
स्पोर्टी रूप
नवी एसपी१६० बारकाईने डिझाइन करण्यात आली असून रायडरचा पूर्ण विचार करत त्यात आकर्षक स्पोर्टी डिझाइन व उपयुक्तता यांचा मेळ घालण्यात आला आहे. या मोटरसायकलच्या टँकच्या ठळक डिझाइनला स्पोर्टी श्राउड्सची जोड देण्यात आली आहे. एयरोडायनॅमिक अंडर काउलमुळे मोटरसायकलच्या स्पोर्टी वैशिष्ट्यांमध्ये आणखी भर पडली आहे. ठळक एलईडी हेडलॅम्पमुळे ही मोटरसायकल देखणी दिसते, शिवाय उठावदार एलईडी टेल लॅम्पमुळे ती वैशिष्ट्यपूर्ण दिसते.
नव्या एसपी१६० मध्ये १३० एमएम रूंदीचे टायर देण्यात आले असून त्यामुळे अक्सलरेशन करताना जास्त चांगले ट्रॅक्शन मिळते. क्रोम कव्हरिंगसह असलेल्या स्पोर्टी मफलरमुळे मोटरसायकलाच्या स्टायलिशपणामध्ये भर पडली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान
एसपी १६० मध्ये ओबीडी२ नियमाचे पालन करणारे होंडाचे मध्यम आकाराचे, आधुनिक १६० सीसी प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय) इंजिन बसवण्यात आले आहे. सुधारित क्षमतेचे हे इंजिन जास्त चांगली कामगिरी करते तसेच त्याची इंधनक्षमताही प्रभावी आहे.
इंजिन सुरू करताना आणि ते उष्ण होत असताना सोलेनॉइड व्हॉल्व्ह इंजिन ऑटोमॅटिक चोक यंत्रणेसारखे काम करते. त्यामुळे इंजिनला इग्निशन वेळेस तसेच ते उष्ण होत असताना अतिरिक्त हवा मिळते. सोलेनॉइड व्हॉल्व्ह सुरू व बंद करण्याचे काम इंजिन कंट्रोल युनिटद्वारे (ईसीयू) नियंत्रित होते व ते इंजिन ऑइलचे तापमान आणि इनटेक हवेच्या दाबावर अवलंबून असते.
आधुनिक आणि कार्यक्षम इंजिन लाँग स्ट्रोकसह तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे जास्त टॉर्क व अधिक चांगली कार्यक्षमता मिळते. १०:१ चे उच्च कॉम्प्रेशन गुणोत्तर मोटरसायकलच्या दमदार कामगिरीत भर घालते.
थंड होण्याची क्षमता उंचावण्यासाठी आणि इनर सिलेंडरमधील कमी करण्यासाठी स्पाइनी स्लीव्ह्ज बाहेरच्या पृष्ठभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. रोलर रॉकर आर्म बसवल्याने उर्जेचे समान वितरण होते आणि फ्रिक्शनचे कमी नुकसान होते.
त्याशिवाय काउंटरवेट बॅलन्सर समाविष्ट करून कंपने कमी करण्यात आली आहेत तसेच कमी ते उच्च आरपीएम रेंजमध्ये सहजपणे अक्सलेरशन होईल याची काळजी घेतली गेली आहे.
आधुनिक डिजिटल मीटरमुळे रायडरला प्रवासातही सर्व अद्ययावत माहिती मिळते. मीटरवर घड्याळ, सर्व्हिस ड्यु इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर, साइड स्टँड इंडिकेटर, फ्युएल गॉज आणि मायलेजशी संबंधित सरासरी इंधन मायलेज, वापरले गेलेले इंधन आणि सरासरी वेग इत्यादी माहिती मिळते.
आरामदायी आणि सोयीस्कर
नव्या एसपी१६० मध्ये सिंगल चॅनेल एबीएस (अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम) देण्यात आली आहे, ज्यामुळे ब्रेकिंगची क्षमता उंचावते. यामुळे कठीण परिस्थितीत किंवा निसरड्या पृष्ठभागावर चाके लॉक होत नाहीत व पर्यायाने जास्त आत्मविश्वासाने रायडिंग करता येते. पेटल डिस्क ब्रेक उष्णतेचे समान वाटप करत असल्यामुळे ब्रेकिंगची क्षमता वाढते. फ्रँट आणि *रियर डिस्क ब्रेक्स यांच्या एकत्रीकरणातून जास्त चांगले ब्रेकिंग व नियंत्रण मिळवता येते.
उच्च कामगिरी करणारे रियर मोनो शॉक सस्पेन्शन सीटच्या खाली टणक डायमंड फ्रेममध्ये बसवण्यात आले आहे. त्यामुळे गाडी चालवताना जास्त आरामदायीपणा व स्थैर्य मिळते
हाय ग्राउंड क्लियरन्समुळे (१७७ एमएम) इंजिन आणि फ्रेम खडबडीत रस्त्यावर पृष्ठभागाला लागत नाही. लांब आणि प्रशस्त सीटमुळे (५९४ एमएम) रायडर तसेच पिलियनसाठी गाडी चालवण्याचा अनुभव आरामदायी होतो. याचा लांब व्हीलबेस (१३४७ एमएम) स्थैर्य आणि आरामदायीपणा देतो.
एसपी १६० मध्ये इंजिन स्टॉप स्विच देण्यात आला आहे, त्यामुळे सिग्नल किंवा छोट्या थांब्यावर सहजपणे इंजिन चालू- बंद करता येते. त्याशिवाय सुरक्षेसाठी यातील महत्त्वाचा घटक म्हणजेच हझार्ड स्विच फ्लॅशिंग इंडिकेटर लाइट्स सुरू करतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती व कमी दृश्यमानता असताना मोठी मदत होते.
सुधारित मूल्य
एचएमएसआयतर्फे नव्या एसपी १६० वर दहा वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज देण्यात आले आहे (३ वर्षांची स्टँडर्ड + ७ वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी).
प्रकार | सिंगल डिस्क | ड्युएल डिस्क |
किंमत (एक्स शोरूम दिल्ली) | रू. १,१७,५०० | रू. १,२१,९०० |
रंगांचे पर्याय | मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक, मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट डार्क ब्लू मेटॅलिक, पर्ल स्पार्टन रेड, पर्ल इग्नियस ब्लॅक आणि पर्ल डीप ग्राउंड ग्रे. |
* ड्युएल डिस्क प्रकारात उपलब्ध
आधुनिक वैशिष्ट्ये आणि उठावदार डिझाइन
स्पोर्टी रूप
- स्पोर्टी श्राउड्स असलेले ठळक टँक डिझाइन
- उठावदार एलईडी हेडलॅम्प आणि आयकॉनिक एलईडी टेल लॅम्पच्या मदतीने घनदाट अंधारातही सहज वाट काढता येणार
- क्रोम कव्हरसह स्पोर्टी मफलर आणि १३० एमएम रूंदी असलेले रियर टायर
- एयरोडायनॅमिक अंडर काउलमुळे स्पोर्टी लूक आणखी आकर्षक
आधुनिक तंत्रज्ञान
-
- ओबीडी२ नियमानुसार बनवण्यात आलेले होंडाचे विश्वासार्ह १६० सीसी ताकदवान, पीजीएम- एफआय इंजिन सोलेनॉइड व्हॉल्व्हसह
- लाँग स्ट्रोक, हाय कॉम्प्रेशन गुणोत्तर (१०:१) आणि स्पाइनी स्लीव्हजसह आधुनिक आणि प्रभावी इंजिन
- उर्जेचे एकसमान वितरण करण्यासाठी रोलर रॉकर आर्म आणि काउंटर बॅलन्सर
- आधुनिक माहिती आणि रायडिंगचा खास अनुभव देण्यासाठी आधुनिक डिजिटल मीटर
आरामदायी आणि सोयीस्कर
- कमी वेळाच्या थांब्यांसाठी इंजिन स्टॉप स्विच
- हाय ग्राउंड क्लियरन्स (१७७ एमएम) आणि लाँग व्हीलबेस (१३४७ एमएम), स्थिर व सुधारित राइडसाठी
-
- लांब सीटमुळे (५९४ एमएम) रायडर आणि पिलियनचा प्रवास होणार सुखकर
- पटकन थांबण्यासाठी आणि कमी दृश्यमानता असलेल्या ठिकाणांसाठी हझार्ड स्विच
- जास्त चांगली स्थिरता आणि हाताळणीसाठी रियर मोनो शॉक सस्पेन्शन
- प्रभावी ब्रेकिंग आणि अधिक चांगल्या नियंत्रणासाठी एबीएससह पेटल डिस्क ब्रेक्स
ग्राहकांसाठी अधिक चांगले मूल्य
- १० वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज (३ वर्षांची स्टँडर्ड + ७ वर्षांची पर्यायी)
- एसपी १६० दोन प्रकारांत उपलब्ध – सिंगल डिस्क आणि ड्युएल डिस्क
- आकर्षक किंमत रू. १,१७,५०० (एक्स शोरूम दिल्ली)