पॉलीकॅब सुपरफास्ट एमसीबीज – इलेक्ट्रिकल सुरक्षा क्षेत्रात नवी समीकरणे

27
polycab

मुंबई, सप्टेंबर २०२३ – भारतातील आघाडीची इलेक्ट्रिकल उत्पादक कंपनी पॉलीकॅब इंडिया लिमिटेडने माहितीपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅम्पेन्सची (डीव्हीसीज) सीरीज लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. घरातील सुरक्षा वाढवण्यासाठी एमसीबीची (मिनिएचर सर्किट ब्रेकर) भूमिका किती महत्त्वाची असते याविषयी ग्राहकांना शिक्षित करण्यासाठी ही सीरीज लाँच केली जात आहे. आपल्या दिनक्रमात इलेक्ट्रिकल सिस्टीम्सचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे, मात्र त्याकडे सहज दुर्लक्ष केले जाते. त्याविषयी जाणून घेण्याची गरज लक्षात घेत पॉलीकॅब इंडियाने इलेक्ट्रिकल सुरक्षेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे.

ऑग्लिवीने तयार केलेल्या या डीव्हीसीमध्ये उत्सफूर्तता, उत्सुकता आणि आश्चर्याचा धक्का (जलद कृती) यांचा अनोखा मेळ घालत कशाप्रकारे पॉलीकॅबचे सुपरफास्ट एमसीबी तंत्रज्ञान दैनंदिन जीवनात कशाप्रकारे महत्त्वाची भूमिका बजावते हे दाखवण्यात आलं आहे.

पॉलीकॅब एमसीबीमध्ये आधुनित इन्स्टंट ट्रिपिंग तंत्रज्ञान ७ वर्षांच्या वॉरंटीसह देण्यात आले आहे. हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य धोकादायक शॉर्ट सर्किटचा सहज शोध घेते आणि वीजप्रवाह खंडित करण्यासाठी तत्काळ ट्रिप करते.

या सीरीजमध्ये दोन डीव्हीसीचा समावेश करण्यात आला असून त्यात आकर्षक कथानकाच्या माध्यमातून पॉलीकॅब एमसीबीचे सुरक्षा कौशल्य दाखवण्यात आले आहे. बाल्कनीच्या प्रसंगात एक वृद्ध व्यक्ती बसलेली असते, तर लहान मुलं क्रिकेट खेळत असतात. खेळाचा थरार शीगेला पोहोचलेला असताना, सिक्स मारली जाते व बॉल वेगाने त्या वृद्ध व्यक्तीच्या दिशेने येत असतो. आश्चर्यकारकपणे त्या व्यक्तीचा नातू सहजपणे कॅच घेतो व पुढचा धोका टळतो. त्या जबरदस्त कॅचचं कौतुक होत असतानाच इलेक्ट्रिशियन आणि पॉलीकॅब डिस्ट्रिब्युशन बोर्ड व एमसीबीकडे लक्ष वेधलं जातं.

त्याचप्रमाणे दुसऱ्या डीव्हीसीमध्ये लहान मूल हेलिकॉप्टरचा आवाज काढून खेळत असतं. त्याच्या वडिलांना झोप लागलेली असते आणि आपलं मूल काय खट्याळपणा करत आहे, याचा त्यांना पत्ताही नसतो. दरम्यान ते रिमोटवर चालणारं हेलिकॉप्टर वेगाने झोपलेल्या वडिलांच्या दिशेने जात असतं. ते त्यांच्यावर आदळणार इतक्यात आई उशी फेकून संकट परतून लावते. त्यानंतर इलेक्ट्रिशियनचं आगमन पॉलीकॅब एमसीबीची सुपरफास्ट सुरक्षा कौशल्यं दर्शवतं. या नाट्यातून कॅम्पेनची टॅगलाइन – पॉलीकॅब एमसीबी सुपरफास्ट एमसीबी अधोरेखित केली जाते.

हास्य आणि पकड घेणारे रोजच्या आयुष्यातले प्रसंग यातून पॉलीकॅबच्या डीव्हीसीमध्ये रोजच्या आयुष्यातील इलेक्ट्रिकल सुरक्षेचं महत्त्व ठळक करण्यात आलं आहे. त्यातून आपल्याला आठवण करून दिली जाते, की हलक्याफुलक्या क्षणांतही सुरक्षा अतिशय महत्त्वाची असते. पॉलीकॅब एमसीबीचा जलद प्रतिसाद दाखवून हे कॅम्पेन तुमच्या प्रियजनांची आणि चीजवस्तूंची वेगवान, विश्वासार्ह सुरक्षा किती महत्त्वाची आहे हे नव्यानं अधोरेखित करतं.

डीव्हीसी लिंक

https://www.youtube.com/watch?v=d2Qdpr7mfz8

https://www.youtube.com/watch?v=Y-9BFl8war8

पॉलीकॅब इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रमुख विपणन अधिकारी निलेश मालानी म्हणाले, ‘इलेक्ट्रिक यंत्रणेत स्विचगियर्सची भूमिका महत्त्वाची असूनही ते बहुतेक वेळेला दुर्लक्षित राहिल्याचं आपण पाहातो. ते कमी सहभाग प्रकारात मोडत असून सुरक्षेचे स्तंभ आहेत. ते शॉर्ट सर्किट तसेच इलेक्ट्रिकल दुर्घटना होण्यापासून वाचवतात. पॉलीकॅब एमसीबीमध्ये अत्याधुनिक ट्रिपिंग तंत्रज्ञान सात वर्षांच्या वॉरंटीसह देण्यात आले आहे. ’

या कॅम्पेनच्या माध्यमातून ऑग्लिव्हीने कायम दुर्लक्षित राहाणाऱ्या या घटकाकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. भविष्याची काळजी आम्ही समजून घेत असतानाच ग्राहकांबरोबर दृढ नाते प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. घर सुरक्षित ठेवण्यात स्विचगियर्स किती महत्त्वाची भूमिका बजावतात याकडे लक्ष वेधण्याचे व पर्यायाने त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचे स्विचगियर्स अत्याधुनिक तंत्रज्ञान, विश्वासार्हता, अचूकता यांसह तयार करण्यात आले असून ते इलेक्ट्रिक कामकाज सुरळीतपणे पार पाडतात.

ते पुढे म्हणाले, ‘दर्जावर नियंत्रण, जागतिक मापदंडाचे पालन, नाविन्यपूर्ण सेवा, कठोर चाचणी, जागरूकता उपक्रम, प्रतिसादात्मक ग्राहकसेवा आणि उत्पादनामध्ये सातत्यपूर्ण सुधारणा यातून ग्राहकाची सुरक्षितता राखणे हे आमचे उद्दिष्ट आहे.’

श्रेयनामावली

ब्रँड टीम

 • निलेश मालानी – कार्यकारी अध्यक्ष आणि प्रमुख विपणन अधिकारी
 • राजशेखर रेड्डी – उपाध्यक्ष, विपणन
 • अमान महाडेश्वर – सहाय्यक विपणन अधिकारी
 • शशांक शेखर – वरिष्ठ ब्रँड व्यवस्थापक – स्विचगियर

क्रिएटिव्ह:

 • सुकेश नायक – प्रमुख क्रिएटिव्ह अधिकारी – ऑगिल्वी इंडिया
 • विवेक वर्मा – वरिष्ठ क्रिएटिव्ह अधिकारी
 • प्रसाद कुलकर्णी – वरिष्ठ क्रिएटिव्ह अधिकारी
 • श्रीन्जयी सेनगुप्ता – क्रिएटिव्ह सुपरवायजर

अकाउंट व्यवस्थापन

 • व्हीआर राजेश – समूह अध्यक्ष – ऑग्लिवी इंडिया
 • अमरिंदर बुटालिया – सहकारी अध्यक्ष
 • धारल गोशालिया – वरिष्ठ उपाध्यक्ष
 • अम्रिता बासू – ग्राहक सेवा संचालक
 • सिम्रन बाज्वा – वरिष्ठ अकाउंट एक्झक्युटिव्ह
 • अभिषेक केरकेट्टा – वरिष्ठ अकाउंट एक्झक्युटिव्ह

धोरण:

 • प्रेम नारायण: प्रमुख धोरण अधिकारी – ऑग्लिवी इंडिया
 • संहिता चौधरी – उपाध्यक्ष

निर्मिती संस्था

गुड फिल्म्स ओन्ली

संचालक – विवेक दुबे

कार्यकारी निर्माते – कमिल अली आणि सुरोजित देव