पेरा सीईटी-२०२३ परीक्षेचाचा दुसरा राऊंड २८ ते ३० जून ला होणार

30

पुणे, १० जून २०२३ : प्रीमिनेंट एजुकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशन (PERA) अर्थात `पेरा` या खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या वतीने पेरा सीईटी-२०२३ चा पहिला राऊंड मे महिन्यात घेण्यात आला होता. मात्र, विद्यार्थी व पालकांच्या जबरदस्त मागणीमुळे या परीक्षेचा दुसरा राऊड आता २८, २९ व ३० जून रोजी घेण्यात येणार आहे.

या परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना राज्यातील विविध २0 खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश प्राप्त करता येणार आहे. मे महिन्यात झालेल्या प्रमाणेच ही परीक्षादेखील ॲनलाईन प्राॅक्टर्डद्वारेच घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंत आनलाईन नावनोंदणी करावी लागणार आहे. ५ जुलै रोजी या दुसऱ्या राऊंडच्या परीक्षेचा निकाल घोषित केला जाणार आहे.

मागील पेरा-सीईटीला मिळाला जबरदस्त प्रतिसाद मे महिन्यात झालेल्या परीक्षेला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या परीक्षेचा लाभ तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांना झाला असून, या विद्यार्थ्यांना आता विविध विद्यापीठांच्या वेगवेगळ्या कोर्सेससाठी प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आणखी मोठ्या संख्येने विद्यार्थी हे खासगी विद्यापीठांच्या कोर्सेससाठी इच्छुक असल्या कारणाने या विद्यार्थ्यांनाही संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या परीक्षेचा दुसरा राऊंड घेण्यात येत आहे.

यासंदर्भात बोलताना पेरा चे अध्यक्ष तथा एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. मंगेश कराड म्हणाले की, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठांच्या सर्वोत्तम कोर्सेससाठी प्रवेश प्राप्त व्हावा, या दृष्टीने पेरा कार्यरत असते. मुळात पेरा या संघटनेची स्थापना ही खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राला एका उंचीवर नेण्यासाठी आणि उच्च शिक्षणात नवनवीन प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान, पाठ्यक्रमांमध्ये नावीन्य आणि लवचिकता आणण्यासाठी झाली आहे. उच्च शिक्षण, संशोधन, इतर अभ्यासक्रमेतर आणि सह-अभ्यासक्रम क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे, उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण अनुकूल उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी मदत करणे, ज्ञानाच्या प्रगतीमध्ये मदत करणे वगैरे या संघटनेची उद्दिष्टे आहेत.

पेरा अंतर्गत असलेली विद्यापीठे याप्रमाणे : एमआयटी-एडीटी, एमआयटी-डब्ल्यूपीयू, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, संदीप युनिव्हर्सिटी, स्पायसर, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, एमजीएम युनिव्हर्सिटी, सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, संदीप युनिव्हर्सिटी, सोमैय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, विजयभूमी युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चर ॲण्ड टेक्निकल युनिव्हर्सिटी, श्री बालाजी युनिव्हर्सिटी, फ्लेम युनिव्हर्सिटी, डाॅ. पी. ए. ईनामदार युनिव्हर्सिटी, जेएसपीएम युनिव्हर्सिटी, एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी.