पेढांबे येथे ८ मे रोजी राज्यस्तरीय भव्य बैलगाडी स्पर्धेचा थरार

71

चिपळूण/ प्रतिनिधी. ( विलास गुरव ) चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दि. ८ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तालुक्यातील पेढांबे भराडेवाडी येथे कोकण सह्याद्री हिंद केसरी, आमदार चषक २०२३ राज्यस्तरीय भव्य बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, चिपळूण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, युवक मेहनत घेत आहेत. तर चिपळूण गुहागर तालुका बैलगाडी शर्यत असोसिएशन व सर्व जमिन मालकांचे या स्पर्धेला सहकार्य लाभणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ५१ हजार रूपये, व्दितीय क्रमांकास ३१ हजार रूपये, तृतीय क्रमांकास २१ हजार रूपये, चतुर्थ क्रमांकास ११ हजार रूपये, पाचव्या क्रमांकास १० हजार रूपये पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. दि. ७ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धेचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी रोहित राणे ९०११५४५७५८, प्रज्योत पवार ७७७९४१७७८१, अमित जाधव ७७९८५४३४३७ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय, चिपळूण येथे संपर्क साधावा.