पेटीएम यूपीआय लाइट १० बँकांवर सक्रिय

52
Paytm UPI Lite Active on 10 Bank

पुणे, २४ मार्च २०२३: भारतातील स्वदेशी पेटीएम पेमेंट्स बँकेने पेटीएम यूपीआय लाइटच्या माध्यमातून एका टॅपमध्ये रिअल-टाइम अत्यंत गतीशील यूपीआय पेमेंट्स शक्य केले आहे. बँकांना सर्वाधिक व्यवहार होण्याच्या तासांदरम्यान यशस्वी दराच्या बाबतीत समस्या असताना देखील हे पेमेंट्स कधीच अयशस्वी ठरत नाहीत.

सध्‍या १० बँका पेटीएम यूपीआय लाइटला समर्थन देत आहेत. यामध्ये पेटीएम पेमेंट्स बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आदींचा समावेश आहे.

पेटीएम यूपीआय लाइटच्या माध्यमातून व्यवहारांचे यशस्वी दर अधिक सुधारण्यात आले आहेत, जेथे ही सेवा लहान मूल्याच्या पेमेंट्ससाठी बँक सिस्टम्सवरील भार कमी करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. हे यशस्वी पेमेंटसाठी आधुनिक यूपीआय लाइट तंत्रज्ञानाद्वारे समर्थित आहे, जे ३-स्तरीय बँक-ग्रेड सुरक्षा देते.