पुरूषांची फॅशन ही महिलांइतकी ग्लॅमरस नसते. त्यातही ऑफिस ड्रेसिंगचा विचार केला जातो, त्यावेळी फॅशनविषयीच्या जागरूकतेचा त्यात फारच अभाव दिसून येतो.
PUNE NEWS: पुण्यात अधिकाऱ्याची मुजोरी, लाथ मारून उडवला स्टॉल; पाहा धक्कादायक VIDEO
मात्र तरीही पुरुषांच्या कार्यालयीन वस्त्रप्रावरणांमध्ये प्रशांत भाटिया यांनी आपले कौशल्य आणले आहे. या संदर्भातील आपले विचार व अनुभव यांवर आधारीत भाटिया यांनी लिहिलेल्या ‘ड्रेस द पार्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत करण्यात आले.
तुम्हाला YOUTUBE वरील ADS चा त्रास होतो? अशा प्रकारे करा ब्लॉक; काही मिनिटांत होईल सुटका
केंब्रिज अॅपेरेल्स या ६३ वर्षे जुन्या पोशाख ब्रॅंडचे व्यवस्थापकीय भागीदर असलेले प्रशांत भाटिया यांच्या या पहिल्याच पुस्तकात पुरुषांनी कार्यालयांत वापरावयाच्या पोशाखाविषयीच्या प्रचलित समजुती व त्यांतील कल यांचा उहापोह केला आहे. कार्यालयांत पुरुषांनी कोणत्या स्वरुपाचे कपडे वापरावेत, याबद्दलच्या व्यावहारिक टिप्स आणि सूचनाभाटिया यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. सर्व वयोगटातील आणि सर्व प्रकारच्या शारिरीक बांध्याच्या पुरुषांसाठी उपयुक्त मार्गदर्शन ‘ड्रेस द पार्ट’मध्ये आहे.
भाटिया हे स्वतः सुमारे २३ वर्षांपासून कपड्यांचा एक यशस्वी ब्रँड चालवीत आहेत. त्यांनी पुरुषांच्या फॅशनची उत्क्रांती पाहिली आहे. फॅशनमधील प्रचलित कल ओळखणे आणि त्या अनुषंगाने क्लासिक स्वरुपाचे पोशाख तयार करणे याचा फार मोठा अनुभव भाटिया यांना आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पुरुषांच्या शैलीशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.
PUNE NEWS : पुण्यात तुफान हाणामारी…कारण ऐकाल तर तुम्हीही चक्रावाल
पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याप्रसंगी प्रशांत भाटिया म्हणाले, “कपडे आणि पादत्राणे यांतून माणसाला ओळख घडते. मात्र तरीसुद्धा कार्यालयात काम करताना उत्तम पोशाख करण्यास अनेक पुरूष प्राधान्य देत नाहीत.
झेरॉक्सचं दुकान दाखवतो म्हणत प्रवाशासोबत भयानक कांड; नागरिकांमध्ये दहशत, वाचा नेमकं काय घडलं?
माझ्या मते त्यांनी पोषाखाला महत्त्व दिले पाहिजे. कपडे हे माणसाची ताकद आणि व्यक्तिमत्व या गोष्टी दर्शवितात. मी पुरुषांची फॅशन विकसित होताना पाहिली आहे आणि मला विश्वास आहे की काही मूलभूत सूचनांचे पालन केल्यास पुरुषांना कामाच्या ठिकाणी आपली विशिष्ट शैली निर्माण करता येते. माझ्या पुस्तकात हा सर्व तपशील आहे.
पुरुषांना त्यांच्या कपड्यांची निवड अधिक चांगल्या पद्धतीने करता यावी, यासाठी यात मार्गदर्शन करण्यात आले आहे, तसेच ऑफिसमध्ये सर्वांसमोर चांगली छाप पाडण्यासाठी इतर अनेक सूचना यात मी दिल्या आहेत. माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवामध्ये, मी रंग, त्यांचे संयोजन, कपड्यांची मापे, शारिरीक ठेवण आणि विविध प्रयोग यांबाबतच्या मूलभूत व प्रगत संकल्पना शिकलो आहे. मला हे सर्व ज्ञान पुरूषांपर्यंत पोहोचवायचे आहे.
विशेषत:, कामावर जाताना योग्यरित्या तयार होणे म्हणजे अप्रासंगिक, कंटाळवाणा आणि महागडा प्रकारअसतो, असा समज असणाऱ्या युवकांना या पुस्तकाच्या माध्यमातून मला चार धडे द्यायचे आहेत. या विषयाच्या संदर्भात इंटरनेटवर पुरेशी माहिती असूनहीमाझे पुस्तक सर्व वयोगटाच्या व शारिरीक ठेवणीच्या पुरुषांना आवडेल आणि ते नेहमी जवळ बाळगावे असे त्यांना वाटेल, अशी मला खात्री आहे.”
‘ड्रेस द पार्ट’च्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित असलेल्या रसिकांनी भाटिया यांची भेट घेतली आणि खरेदी केलेल्या प्रतींवर स्वाक्षरी घेतली. हे पुस्तक अॅमेझॉनवर ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहे, असे यावेळी सांगण्यात आले.