पुणे, ११ डिसेंबर २०२२ : बीएमडब्ल्यू इंडियाने आज देशामध्ये नवीन ड्राइव्ह लाँच केली आहे. बीएमडब्ल्यू ग्रुप प्लांट, चेन्नई येथे स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात आलेली कार बीएमडब्ल्यू डीलरशिप नेटवर्कमध्ये च्या माध्यमातून बुकिंग्जसाठी उपलब्ध आहे. डिलिव्हरींना जानेवारी 2023 पासून सुरूवात होईल.
2021 मध्ये विशेषत: भारतीय बाजारपेठेसाठी लाँच करण्यात आलेली बीएमडब्ल्यू एम 340 आई भारतात निर्माण करण्यात आलेली एम इंजिनने युक्त पहिली हाय-परफॉर्मन्स बीएमडब्ल्यू आहे. मॉडेल तिची लक्षवेधक कार्यक्षमता, आकर्षक डिझाइन, संपन्न फिचर यादी आणि तिच्यामध्ये असलेल्या अद्वितीय एम ड्रायव्हिंग एक्स्पेरिअन्समुळे विभागातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.
बीएमडब्ल्यू एम 340 आई मध्ये ‘अल्टिमेट ड्रायव्हिंग मशिन’ – बीएमडब्ल्यू 3 सिरीज आणि एम च्या शक्तीचे परिपूर्ण मिश्रण आहे. बीएमडब्ल्यू एम ने निर्माण केलेली ही कार 3 चे विलक्षण स्पोर्टिंग तत्व देते, तसेच मोटरस्पोर्टसाठी बीएमडब्ल्यू एम ची खरी आवड सामावलेली आहे. हे सर्वोत्तम संयोजन ड्रायव्हर्ससाठी अल्टिमेट ॲड्रेनालाइन रश आहे.
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष श्री. विक्रम पावाह म्हणाले, ‘’ बीएमडब्ल्यू एम 340 आई एक्स ड्राइव्ह ही निश्चितच यशस्वी कार आहे, कारण ही कार मध्यभागी असलेल्या एम च्या शक्तीमुळे विविध स्तरावर शीअर ड्रायव्हिंग प्लेझरचा थरार देते. हे लक्षवेधक सूत्र दररोज वापरासाठी प्रिमिअम सेदान पाहिजे असलेल्या ऑटो उत्साहींच्या गरजांची पूर्तता करते, ज्यामुळे गरजेच्या वेळी परफॉर्मन्स मशिन दुप्पट कार्य करते. ही कार आज बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाच्या सर्वाधिक विक्री होणा-या मॉडेल्सपैकी एक आहे. नवीन बीएमडब्ल्यू एम 340 आई एक्स ड्राइव्हमध्ये एम परफॉर्मन्स, अनबीटेबल डायनॅमिक्स, एैसपैस जागा, आरामदायीपणा व नवोन्मेष्कारी फिचर्सचे परिपूर्ण पॅकेज आहे. हा नवीन सुधारित अवतार एम 340 आई च्या अग्रणी स्थितीला अधिक दृढ करेल आणि अधिकाधिक ब्रॅण्ड चाहते व एम उत्साहींचे मन जिंकेल.’’
कार पुढील आकर्षक एक्स-शोरूम किंमतीमध्ये उपलब्ध आहे –
नवीन बीएमडब्ल्यू एम 340 आई एक्स ड्राइव्ह : आईएनआर- 69,20,000
इन्वॉइसिंगच्या वेळी अस्तित्वात असलेली किंमत लागू असेल. एक्स-शोरूम किंमती जीएसटी सह (कम्पेशन सेससह) लागू होतील. परंतु त्यात रोड टॅक्स, टॅक्स कलेक्टेड ॲड सोर्स (टीसीएस), आरटीओ स्टॅट्युअरी टॅक्सेस/फीज, इतर स्थानिक कर / उपकर आकारणी आणि इन्शुरन्स या गोष्टी त्यातून वगळल्या जातील. किंमत/पर्याय पूर्वसूचनेशिवाय बदलणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी कृपया ऑथोराइज्ड बीएमडब्ल्यू डिलरशी संपर्क साधावा.
नवीन बीएमडब्ल्यू एम 340 आई एक्स ड्राइव्ह पुढील मेटलिक पेंटवर्क्समध्ये उपलब्ध आहे – मिनरल व्हाइट, ड्रॅव्हिट ग्रे, ब्लॅक सफायर आणि टान्झानाइट ब्ल्यू्. तसेच यामध्ये कॉन्ट्रास्ट स्टिचिंग ब्ल्यूसह ब्लॅकमधील विशेष अॅल्कान्तारा / सेन्सटेक कॉम्बीनेशन अपहोल्स्टरी आहे.
बीएमडब्ल्यू एम परफॉर्मन्स अॅक्सेसरीज कस्टमायझेशनसाठी आकर्षक पर्याय देतात आणि वेईकलमध्ये ड्राइव्हरच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे बदल करण्याची सुविधा देतात.
बीएमडब्ल्यू इंडिया फायनान्शियल सर्विसेसच्या माध्यमातून व्यक्तींच्या गरजांनुसार सानुकूल व स्थिर फायनान्शियल सोल्यूशन्स डिझाइन करता येऊ शकतात. बीएमडब्ल्यू 360˚ अल्टिमेट फायनान्स प्लान एक्सक्लुसिव्ह फायनान्शियल पॅकेजेससह उत्तम मूल्य आणि परिपूर्ण मन:शांती देते. सर्विस इनक्लुसिव्ह आणि सर्विस इनक्लुसिव्ह प्लस मालकीहक्काचा खर्च अधिक कमी करतात. ग्राहक कालावधी / मायलेजनुसार विविध सर्विस प्लान्समधून निवड करू शकतात. पॅकेजेसमध्ये कंडिशन बेस्ड सर्विस आणि मेन्टेनन्स कामासह 3 वर्षे / 40,000 किमी ते 10 वर्षे / 2,00,000 किमी पर्यंतच्या योजनांचा समावेश आहे.
नवीन बीएमडब्ल्यू एम 340 आई एक्स ड्राइव्ह.
नवीन बीएमडब्ल्यू एम 340 आई एक्स ड्राइव्हची एक्स्टीरिअर डिझाइन नेहमीप्रमाणे स्पोर्टी ठेवण्यात आली आहे. पुढील बाजूस व्यापक, लो-स्लंग व गतीशील वैशिष्ट्य आहे. एकाच सराऊंडसह तयार करण्यात आलेले ब्लॅक मेश स्टाइल बीएमडब्ल्यू किडनी ग्रिल ब्ल्यू असेंट्स असलेल्या स्लीक ॲडप्टिव्ह एलईडी हेडलाइट्सशी जोडण्यात आले आहे. कारचे हूड, लांब व्हीलबेस, लहान ओव्हरहँग्स आणि आकर्षक दिसणारे रूफलाइन कारला बाजूने पाहिल्यास स्पोर्टिंग लुक देतात. एक्स्टीरिअर मिरर कॅप्स त्यांच्या एम एक्स्टीरिअर मिरर कॅप्सवर आधारित डिझाइनमुळे लक्षवेधक प्रिमिअम लूक देतात. आडव्या रेषा आणि स्लिम, स्टायलिशली डार्कन लाइट युनिट्समधील एल -शेप्ड एलईडी टेललाइट्स पुढील बाजूस व्यापक व ॲथलेटिक पवित्रा देतात. एम ऐरोडायनॅमिक्स पॅकेजने युक्त कारमध्ये बूटलिडवर बॉडी कलर्ड एम रिअर स्पॉइलर आहे. वेईकलचे आकर्षक लुक एअर इनटेक स्ट्रट्स आणि ट्रेपेझॉयडल टेलपाइप ट्रिम्सच्या माध्यमातून अधिक वाढवण्यात आले आहे. 791 एम स्टायलिंग, डायमंड पॉलिश व जेट ब्लॅकमधील 19–इंच एम लाइट अलॉई व्हील्स गतशील रेसिंग मशिनची खात्री देतात.
इंटीरिअरमध्ये लक्झरी, आरामदायीपणा आणि एम ची सुधारित फिलिंग समाविष्ट आहे. लक्ष वेधून घेतलेला पहिला घटक म्हणजे नवीन डिजिटल बीएमडब्ल्यू कर्व्ह डिस्प्ले, जो एकसंधीपणे कॉकपीट एरियामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, ज्यामधून ते प्रवाहित होत असल्यासारखे वाटते. सुस्पष्ट डिझाइन, लक्षवेधक ग्राफिक्स, आधुनिक आकर्षक रंग, भविष्यकालीन टेक्स्चर्स आणि रिफ्लेक्शन्सचे इंटरप्ले सर्वोत्तम व्हिज्युअल लुक देतात. स्पोर्ट सीट्ससह सेन्सेटेक/ॲल्कन्तारा ट्रिममधील एम-स्पेसिफिक अपहोल्स्टरी मागील बाजूस आरामदायी प्रवासाची खात्री देते आणि त्यामध्ये व्यापक समायोजन करण्याची सुविधा आहे. एम लेदर स्टिअरिंग व्हीलसह शिफ्ट पॅडल्स रेस कार सारखा अनुभव देतात. एमहाय-ग्लॉस शॅडोलाइन, इंडिव्हिज्युअल हेडलाइनर ॲन्थ्रासाइट आणि कार्बन फिब्रेमधील इंटीरिअर ट्रिम स्ट्रिप्स यासह कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यात आली आहे. विशेष डिझाइन फिचर्स म्हणून डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि फ्रण्ट डोअरसिल्समध्ये मॉडेल लेटरिंग ‘एम 340 आई’ आहे. साइड सिलमधून आलेले वेलकम लाइट कारपेट प्रवाशांचे ग्लॅमरस स्टाइलमध्ये स्वागत करते. सहा डिमेबल लाइट डिझाइन्स असलेले अॅम्बियण्ट लायटिंग प्रत्येक मूडसाठी वातावरणाची निर्मिती करते, तर ऑटोमॅटिक 3 झोन एसी परिपूर्ण तापमान राखते. एैसपैस जागेला साजेसे मोठे ग्लास सनरूफ आहे. मोठ्या लगेज कम्पार्टमेंटची क्षमता 480 लीटर्स आहे. 40:20:40 स्प्लिट बॅकरेस्ट व ऑटोमॅटिक बूट लिड ऑपरेशन सामान ठेवण्यासाठी / काढण्यासाठी अधिक स्थिरता देते. कारच्या हार्मन कार्डन सराऊंड साऊंड सिस्टिमसह 16 लाऊडस्पीकर्स मधुरमय संगीत ऐकू येण्याची खात्री देतात.
नवीन बीएमडब्ल्यू एम 340 आई एक्स ड्राइव्हमध्ये 2,998 सीसी स्ट्रेट-सिक्स पेट्रोल इंजिनची शक्ती आहे, जे 374 एचपी चे आऊटपूट आणि 500 एनएम अधिकतम टॉर्कची निर्मिती करू शकते. यासोबत वैशिष्ट्यपूर्ण साऊंड आहे, ज्याचे श्रेय एम स्पोर्ट एक्झॉस्ट युनिटला जाते. कार 4.4 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी/तास गती प्राप्त करते, ज्यामुळे ही देशामध्ये निर्माण करण्यात आलेली सर्वात गतीशील बीएमडब्ल्यू आहे.
एट-स्पीड स्टेप्ट्रॉनिक स्पोर्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अत्यंत सुलभ आणि जवळपास सर्वोत्तम गिअरशिफ्ट्स देते. कोणत्याही वेळी, कोणत्याही गिअरमध्ये ट्रान्समिशन इंजिनसोबत उत्तमरित्या जोडले जाते आणि त्यामुळे त्याची पूर्ण शक्ती व कार्यक्षमता वापरणे शक्य होईल. अधिक चांगल्या ड्रायव्हिंग आनंदासाठी ही कार स्टीअरिंग व्हील पॅडल शिफ्टर्स आणि क्रूझ कंट्रोलसोबत उपलब्ध असून त्यात प्रमाणित म्हणून ब्रेकिंग फंक्शन आहे. ड्रायव्हिंग एक्स्पिरियन्स कंट्रोल मोड्स स्पोर्ट आणि स्पोर्ट+ रिअर व्हील्सना शक्ती ट्रान्सफर करत अधिक डायनॅमिक ड्रायव्हिंगला पाठिंबा देण्यामध्ये मदत करतात.
बीएमडब्ल्यू एक्स ड्राइव्ह हे इंटेलिजण्ट ऑल-व्हील ड्राइव्ह टेक्नोलॉजी ड्रायव्हिंग स्थितींवर देखरेख ठेवते आणि अधिकतम ट्रॅक्शन, एजिलिटी व वेईकल स्थिरतेच्या खात्रीसाठी त्वरित प्रतिसाद देते. स्टॅण्डर्ड एम स्पोर्ट रिअर डिफरेन्शिअल प्रत्येक चाकाला शक्तीच्या वितरणावर इलेक्ट्रॉनिकली कंट्रोलिंग करत ट्रॅक्शन व कॉर्नरिंग वाढवते. यामुळे विविध डायरेक्शन व लोडच्या स्थितींमध्ये अंडरस्टिअर व ओव्हरस्टिअर टाळण्यामध्ये मदत होते. डायनॅमिक ड्रायव्हिंगसाठी कायनेमॅटिक्स व इलास्टोकायनेमॅटिक्स ट्यूनसह एम स्पोर्ट सस्पेंशन राइडची उंची 10 मिमीने कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामधून अधिक सर्वसमावशेक ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. वेरिएबल स्पोर्ट स्टिअरिंग हलकेसे स्टिअरिंग हलवले तरी अचूक प्रतिसाद देते. एम स्पोर्ट ब्रेक्स शहरातील रस्त्यांवर ड्रायव्हिंग करायची असो किंवा ट्रॅकवर रेसिंग करायची असो उत्तम ब्रेकिंग परफॉर्मन्स व सर्वोत्तम भावना देतात. ब्रेक कॅलिपर्सना निळा रंग देण्यात आला आहे आणि त्यावर एम लोगोचे डिस्प्ले दिसते. बीएमडब्ल्यू परफॉर्मन्स कंट्रोल सिस्टम चाकांच्या ब्रेकिंगवर लक्ष केंद्रित करत कारची स्थिरता वाढवते.
नवीन बीएमडब्ल्यू कनेक्टेड ड्राइव्हच्या नवोन्मेष्कारी वैशिष्ट्यांनी कारला इंटरकनेक्टेड डिवाईसमध्ये रूपांतरित केले आहे, ज्यामुळे ग्राहकांना डिजिटली कनेक्टेड वातावरणाचा अनुभव मिळतो. बीएमडब्ल्यू आयडी सेंट्रल लॉगिन सारखे काम करत सुरक्षितपणे डेटा सिन्क्रोनाइज करते आणि बीएमडब्ल्यू इकोसिस्टममधील सर्व गरजांसाठी आपोआपपणे नवीन युनिव्हर्सल इंटरफेस स्मार्ट माय बीएमडब्ल्यू ॲपशी लिंक होते. ग्राहक त्यांच्या पुढील ट्रिपसाठी प्लान करू शकतात, त्यांच्या बीएमडब्ल्यू ची स्थिती तपासू शकतात, वैयक्तिकृत कार सेटिंग्ज सेट करू शकतात, पुढील सर्विस अपॉइण्टमेंट बुक करू शकतात किंवा अनेक रिमोट-कंट्रोल फंक्शन्समधून एका फंक्शनचा वापर करू शकतात. या सर्व गोष्टी स्मार्टफोनमधून सोईस्करपणे करता येतात. ओव्हर-द-एअर थ्रू बीएमडब्ल्यू रिमोट सॉफ्टवेअर अपग्रेड्ससह आणण्यात आलेले आधुनिक फंक्शन्स व डिजिटल प्रॉडक्ट्ससह कार अद्ययावत करण्यात आली आहे.
बीएमडब्ल्यू ऑपरेटिंग सिस्टम 8 वर कार्यान्वित नवीन बीएमडब्ल्यू लाइव्ह कॉकपीट प्लस अधिक एकसंधी, वैयक्तिक व नैसर्गिक इन-कार अनुभव देते. ते कोरिओग्राफ केलेले स्टार्ट-अप ॲनिमेशन आणि वैयक्तिक अभिवादनासह ड्रायव्हरचे स्वागत करते. डिस्प्लेमध्ये दोन मुख्य घटक आहेत – 14.9” टच-ऑप्टिमाइज्ड सेंट्रल इन्फर्मेशन डिस्प्ले आणि 12.3” इन्स्ट्रूमेंट क्लस्टर डिस्प्ले. मोठ्या, वक्राकार सेंट्रल इन्फॉर्मेशन डिस्प्लेमध्ये सुधारित एर्गोनॉमिक्स, सर्वोत्तम ड्रायव्हर ओरिएटेशन, नवीन डायरेक्ट शॉर्टकट्स आणि युजर-अनुकूल ॲप-लाइक मेनू रचना आहे. ते क्लाऊड-बेस्ड 3डी नेव्हिगेशन, संगीत, फोन फंक्शन्स, कार कंट्रोल्स आणि इतर सेटिंग्ज सुलभपणे उपलब्ध करून देते. डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर डिस्प्लेजमध्ये मल्टीफंक्शन स्टिअरिंग व्हीलच्या मागील बाजूस असलेली सर्व संबंधित वेईकल / ड्राइव्ह संबंधित माहिती मिळते.
प्रवाशी त्यांच्या बीएमडब्ल्यू इंटेलिजण्ट पर्सनल असिस्टण्टशी संवाद साधत सुलभपणे अनेक कार फंक्शन्स ऑपरेट करू शकतात. सेंटर कन्सोलमध्ये एकीकृत असलेले स्मार्टफोन होल्डर मोबाइल्ससाठी इंडक्टिव्ह, वायरलेस चार्जिंग सुविधा देते. वायरलेस ॲप्पल कारप्ले® / अँड्रॉईड ऑटोच्या माध्यमातून स्मार्टफोन कनेक्शन विविध फंक्शन्स व अॅप्स उपलब्ध होण्याची खात्री मिळते.
बीएमडब्ल्यू डिजिटल की प्लस सोयीसुविधेमध्ये नवीन मानक स्थापित करते. ड्रायव्हर कारजवळ येताच दरवाजे आपोआपपणे अनलॉक होतात आणि लाइट कारपेटसह ऑर्केस्ट्रा सारख्या लायटिंग इफेक्टमध्ये ड्रायव्हरचे स्टायलिश स्वागत केले जाते. कम्फर्ट ॲक्सेस सिस्टम ड्रायव्हरला की स्पर्श न करता कार डोअर उघडण्याची व इंजिन चालू करण्याची सुविधा देते. स्मार्टफोनच्या माध्यमातून रिमोट लॉकिंग / अनलॉकिंगची सुविधा मिळते, तसेच टॉप स्पीड, इंजिन पॉवर, अधिकतम ऑडिओ व्हॉल्यूम यांचे कन्फिग्युअर करता येते.
बीएमडब्ल्यू हेड-अप डिस्प्ले विंडस्क्रिनवर ड्रायव्हरला सुस्पष्टपणे दिसेल अशी ड्रायव्हिंग संबंधित माहिती दाखवतो. यामुळे ड्रायव्हरला ड्रायव्हिंगच्या वेळी रस्त्यावरून लक्ष विचलित न होता ड्रायव्हिंग संबंधित बरीच माहिती मिळते. पार्किंग असिस्टण्टसह रिअर व्ह्यू कॅमेरा अवघड जागेमधील पार्किंग सुलभ करतो. रिव्हर्सिंग असिस्टण्ट पार्किंगच्या ठिकाणावरून किंवा अरूंद मार्गावरून कार रिव्हर्स घेताना उत्तम सुविधा देते. ते चाललेल्या मागील 50 मीटर अंतराची नोंदणी ठेवते आणि स्टिअरिंगवर नियंत्रण ठेवत साह्य करते.
बीएमडब्ल्यू एफिशिएण्ट डायनॅमिक्समध्ये ऑटो स्टार्ट-स्टॉप, ब्रेक-एनर्जी रिजनरेशन, इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टिअरिंग, 50:50 वेट डिस्ट्रिब्युशन आणि ड्रायव्हिंग एक्स्पेरिअन्स कंट्रोलमधील इको प्रो मोड आहे.
बीएमडब्ल्यू सेफ्टी टेक्नोलॉजीजमध्ये सहा एअरबॅग्ज, अटेन्टिव्हनेस असिस्टण्स, ॲण्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) सह ब्रेक असिस्ट, डायनॅमिक स्टेबिलिटी कंट्रोल (डीएससी) सह डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल (डीटीसी), कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल (सीबीसी), इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्ड, साइड-इम्पॅक्ट प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक वेईकल इम्मोबिलायझर व क्रॅश सेन्सर्स, रनफ्लॅट टायर्ससह टायर प्रेशर इंडीकेटर, आईएसओ फिक्स चाइल्ड सीट माऊंटिंग आणि इंटीग्रेटेड एमर्जन्सी स्पेअर व्हील आहे.