पुण्यामध्ये १ ते ३ डिसेंबर दरम्यान प्लबिंग कॉन्फरन्सचे आयोजन

101

पुणे,१६ नोव्हेंबर,२०२२: इंडियन प्लंबिंग कॉन्फरन्स आणि प्रदर्शनाची २८ वी आवृत्ती पुण्यामध्ये १ ते ३ डिसेंबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. ‘अॅडव्हान्समेंट इन प्लंबिंग फॉर बिल्ट एन्व्हायर्नमेंट’ अशी या कॉन्फरन्सची थीम आहे.या कॉन्फरन्सचे आयोजन इंडियन प्लंबिंग असोसिएशनने देशभरातील विविध शहरांमध्ये केले आहे.पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर पुण्यात तीन दिवसीय कॉन्फरन्स होत असून, ही कॉन्फरन्स डेक्कन कॉलेज मैदान, येरवडा पुणे येथे होणार आहे.

कॉन्फरन्समध्ये विद्यार्थ्यांसह बिल्डिंग सर्व्हिसेस आणि प्लंबिंग समुदायातील व्यावसायिकांसाठी ही चांगली संधी आहे. ही कॉन्फरन्स प्लंबिंग आणि संबंधित क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी तांत्रिक सत्रे आणि महत्त्वपूर्ण विषयांवर संवादात्मक पॅनेल चर्चेच्या माध्यमातून नवीनतम उत्पादने, स्थापना आणि तंत्रज्ञानावरील कल्पना आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक समान व्यासपीठ म्हणून काम करेल.