पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा खून, हत्येनंतर आरोपीने केला धक्कादायक प्रकार

808

पुणे | पुण्यात लॉकडाऊनदरम्यान, गुन्ह्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आताही गुन्ह्याचा भयंकर प्रकार पुण्याच्या शिरुर तालुक्यात समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाकडून तरुणीची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव इथं हा प्रकार समोर आला आहे. तरुण आणि तरुणी प्रेमसंबंधामुळे एकत्र राहत होते.

पण अंतर्गत वाद झाल्यामुळे तरुणाने तरुणीची हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने तरुणीची हत्या केल्यानंतर स्वत: पोलीस स्थानकात हजर झाला आणि गुन्ह्याची कबूली दिली.

यासंपूर्ण प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसून पोलीस चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.तरुणाच्या सांगण्यावरुन पोलिसांनी घटनास्थळ दाखल. तिथून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

दरम्यान, पुण्यात गुन्ह्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. भर दिवसा अशा प्रकारे खूनाचे आणि हाणामारीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे गुन्हेगांरामध्ये पोलिसांचा धाक नाही का असा सवाल उपस्थित होतो.