पुण्यात गृहप्रकल्पांची संख्या २६.३ टक्क्यांनी वाढली:प्रॉप टायगर’च्या अहवालातील निष्कर्ष

138

पुणे, दिनांक, १९,ऑगस्ट,२०२०१ : कोरोनाच्या परिस्थितीतून सावरत असलेल्या बांधकाम क्षेत्रातील सकारात्मक चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे.

या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पुण्यात सुरू झालेल्या गृह प्रकल्पांची टक्केवारी २६.३ ने वाढली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात विक्री कमी झाली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांतील चित्र बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा देणारे असल्याचे अग्रगण्य ऑनलाइन रिअल इस्टेट ब्रोकरेज फर्म ‘प्रॉप टायगर’ने (PropTiger.com) त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

जानेवारी-जून २०२१ दरम्यान शहरात एकूण १२,५५८ युनिट्स असलेले गृहप्रकल्प सुरू झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा ९,९४४ होता. दोन्ही वर्षांची तुलना केली असता हा आकडा २६.३ टक्क्यांनी वाढल्याने या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जानेवारी ते जून २०२० दरम्यान पुण्यात २०,४३१ सदनिकांची विक्री झाली होती. मात्र यंदा हा आकडा  १६२२० पर्यंत खाली आला आहे. विक्री २०.६ टक्क्यांनी कमी झाली आहे. विक्री कमी झाली असली तरी नवीन प्रकल्प सुरू होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

दुस-या तिमाहीत (एप्रिल-जून) गेल्या वर्षी १,२५१ सदनिका असलेले प्रकल्प सुरू करण्यात आले होते. त्यात या वर्षी १२५ टक्क्यांनी वाढ होत ही संख्या २,८१० युनिट्सवर पोचली आहे.

रिअल इनसाइट (रेसिडेन्शिअल)मध्ये अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षभराचा विचार केला असता २०२१ च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत पुण्यात निवासी प्रकल्प सुरू करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराची एकूण विक्री २,४९५ युनिट्स होती, जी यंदा ४९ टक्क्यांनी घटली होती.

‘प्रॉप्टिगर डॉट कॉम’, हाउसिंग डॉट कॉम’ आणि ‘मकान डॉट कॉम’ ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मणी रंगराजन म्हणाले, ‘‘रिअल इस्टेटमधील उत्पादनांची मागणी येत्या काळात वाढणार असल्याचे आम्ही केलेले संशोधन आणि बाजार विश्लेषणातून दिसते. गृह कर्जावरील व्याज कमी झाल्याने निवासी मालमत्ता परवडण्याजोग्या झाल्या आहेत. तसेच अनेक वर्षांपासून घरांच्या किमती कमी  आणि स्थिर आहेत.

परवडणा-या घरांचा मुद्दा बाजूला ठेवले तरी संभाव्य घर खरेदीदारांमध्ये स्वतःचे घर घेण्याची जिज्ञासा वाढलेले आहे. कारण सध्या अनेक नोकरदार हे घरातून काम करीत आहे. येत्या काळात देखील त्यांना घरातून काम करावे लागणार, असे चित्र आहे. त्यामुळे कोविड काळात मालकीच्या घराचे महत्त्व वाढले आहे. हे सर्व घटक आणि अर्थ  व्यवस्था घेत असलेली गती हे बांधकाम क्षेत्राच्या वाढीस पूरक ठरणार आहे.’’