पुण्यातील झेड ब्रीजचा काही भाग कोसळला

407

पुणे – राज्यात आज सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुण्यातही शुक्रवारपासून पावसाला सुरूवात झाली आहे. या पार्शवभूमीवर अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असून मध्यवर्ती भागात असलेल्या झेड ब्रीजचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तरीही नागरिकांनी गाड्या हळू चालवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.