पुणे, मार्च २०२३ : पुण्यातील कुशाग्र मुलींनी पटकावली ‘बॉर्नटू शाइन स्कॉलरशीप’ – महाराष्ट्रातल्या काही असामान्य, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलांची दखल देशाला घ्यावी लागली आहे. निरल महेश वाडेकर (१०) संगमनेर (अहमदनगर), अशन्या शर्मा (१०)(पुणे), आस्था प्रसाद (१३)(पुणे) आणि स्वरांगी संदीप खानोलकर (१४)सावंतवाडी, (सिंधुदुर्ग) या मुलीं नी‘बॉर्न टू शाइनस्कॉलरशीप’ पटकावली आहे. विलक्षणकष्ट, चिकाटी व बुद्धिमत्तेच्या जोरावर या मुलींनी ४ लाख रुपयांची ‘बॉर्न टू शाइन स्कॉलरशीप’ मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांना ‘बॉर्न टू शाइन मेंटर्स’ च्या मेंटरशीप प्रोग्रॅमचा लाभही मिळणार आहे.
बॉर्न टू शाइन स्कॉलरशीप ही ‘झील (झी एंटरटेनमेंटएंटरप्राइजेस लिमिटेड) पुरस्कृत शैक्षणिक गुणवत्ता मोहीम असून या मोहिमेचे सहप्रायोजक ‘गिव्ह इंडियाही संस्था ही आहे. या मोहिमे अंतर्गत देशभरातील ३० असामान्य, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलींचा सन्मान केला जातो.
बॉर्न टू शाइन स्कॉलरशीप’ ची दुसरी विजेती असलेली अशन्या शर्माही यक्षगान या शास्त्रीय नृत्यात पारंगत असून यक्षगान राष्ट्रीय पातळीवर न्यावे असा तिचा ध्यास आहे. आपल्या ध्यासातून अशन्या शर्मा हिने वयाच्या ४ थ्या वर्षांपासून यक्षगाना चे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली आहे. अशन्या ही पुण्यातील असून तिने सादर केलेल्या प्रयोगाची दखल शेकडो नृत्यप्रेमी रसिकांनी घेतली होती. अशन्याने अनेक कार्यक्रमसादर केल्याने तिच्यातील कलावंताची दखल रसिकघेत गेले व त्यांच्या सततच्या प्रोत्साहनातून भविष्यात यक्षगान मध्ये कारकीर्द करावी व अनेक विद्यार्थी आपल्याकडून घडावेत अशी इच्छा अशन्या शर्मा हिने व्यक्त करत आहे.
अशीच एक गुणवंत विद्यार्थीनी आस्था प्रसाद आहे. अभ्यासात हुशार पण नृत्यातही पारंगत असलेल्या आस्थाने आपल्या शाळेतल्या सहकारी व मित्रपरिवारा पुढे आदर्श ठेवला आहे. पुण्यात राहणाऱ्या आस्थाने वयाच्या चौथ्या वर्षांपासून यक्षगान मध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. या नृत्यप्रकारात आकर्षक अशी वस्त्र व विविध आभुषणे पेहरावी लागतात. आस्थाला यक्षगानाचा भारतात प्रसार करावासा वाटतो व तो लोकप्रिय व्हावा या दृष्टीने तिला प्रयत्न करायचे आहेत.
बॉर्न टू शाइन स्कॉलरशीप’ मध्ये देशभरातील सुमारे५००० हून अधिक कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या मुलींनी भाग घेतला होता. एखादा कलावंत केवळ कला साकारतनसतो तर त्या मागे त्याचे अविरत श्रम, कष्ट,चिकाटी, शिस्त असतात. त्या प्रमाणेया मुलींकडे केवळ कुशाग्रता नसून त्यांच्या मध्ये जबरदस्त चिकाटी, ध्येयवाद व कष्ट करण्याची इच्छा ही दिसून आलेली आहे.
या संदर्भात ‘बॉर्न टू शाइन स्कॉलरशीप’ चे उद्दिष्ट्य विशद करताना कंपनीचे सीओओ सुमिततयाल म्हणाले की, ‘मुलांमध्ये दडून बसलेली गुणवत्ता शोधणे व तिचा विकास करून एकरोल मॉडेल म्हणून समाजापुढे आणून समाज बदलाचे काम करणे हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही गुणवान विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देऊन त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या गुणवत्तेला अधिक उत्तेजन देत असतो.”
याबद्दल ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड’चे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष उमेश के आर बन्सल म्हणाले की,‘देशातील कुशाग्र व गुणवत्ता असलेल्या मुलांचा शोध घेत समाजात छोटासा सकारात्मक बदल करण्याचा ‘झील’ वगिव्हइंडिया’ या दोघांचा प्रयत्न सन्मानजनक आहे. आमच्या ‘बॉर्न टू शाइन स्कॉलरशीप’ मोहिमेत सामील झालेले प्रत्येक मूल हे ध्येय व दृढनिश्चयाचे उदाहरण आहे. अशा स्कॉलरशीप व मेंटॉरशीप प्रोग्रॅममुळे मुलांच्या गुणवत्तेला बळ मिळेलच पण ही मुलेही पुढे त्यांच्यातील उत्तम गुण समाजाला देत उतराई करतील अशी अपेक्षा आम्हाला वाटते.”