पुण्यातील एआय-ड्रिव्हेन लॅबच्या माध्यमातून हेबर  देणार हरित रसायनशास्त्राला चालना

105
Haber accelerates green chemistry development with an AI-driven lab in Pune
पुणे, २२ जानेवारी २०२३ : भारतातील स्टार्टअप हेबर ने आपल्या केंद्रांचा विस्तार करण्याची घोषणा केली असून त्यात आता आपल्या तऱ्हेच्या पहिल्याच असलेल्या प्रयोगशाळेचा समावेश आहे. यात रासायनिक संशोधन, उपयोजन आणि विश्लेषणात्मक सेन्सर  विकासावर भर देण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेले एलिक्सा (eLIXA®) हे कंपनीचे प्रमुख उत्पादन असून ते कारखान्यातील नमुना संकलन, मापन, विश्लेषण आणि हस्तक्षेप या जिकीरीच्या असलेल्या प्रक्रियेला स्वयंचलित करते.

या नवीन प्रयोगशाळेचे उद्घाटन महत्त्वाच्या वेळी झाले आहे कारण अधिकाधिक कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी आणि तिला चालना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणणे हे अपरिहार्य बनले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या ग्राहकांचे उत्पादन तसेच रासायनिक आणि पाणी-केंद्रित प्रक्रियांची कार्यक्षमता वाढवणे हे हेबरचे उद्दिष्ट आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम आणखी गहिरा करण्याच्या दृष्टीने हेबरने पुण्यातील आपल्या नवीन प्रयोगशाळेच्या माध्यमातून रासायनिक व सेन्सर विकासाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.

उद्योगातील तज्ञांच्या टीमचा आधार लाभलेले हे संशोधन सर्वात कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या पर्यावरणानुकूल रसायनशास्त्राचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल. डाटा सॅम्पलिंग आणि संकलनाची प्रक्रिया अधिक सुरळीत करणे हेही सेन्सर विकासातील ताज्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या प्रयोगशाळेचे लक्ष्य आहे. एलिक्साद्वारे विश्‍लेषण केल्या जाणाऱ्या डेटाची गुणवत्ता सुधारून त्यातून अचूक निष्कर्ष मिळवणे हे त्याचे ध्येय आहे.

स्मार्ट मॉनिटरिंग सेन्सर्स आणि SaaSचा समावेश असलेली उत्पादने यांनी ऑप्टिमाइझ केलेली प्रणाली हा त्याचा अंतिम परिणाम असेल. आवश्यक त्या वापरासाठी फाईन ट्यून केलेल्या रसायनांची कामगिरी त्याला पूरक ठरेल.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक डॉ. आशिष लेले यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ. लेले यांनी म्हणाले, “हेबरसारख्या संस्था संशोधन आणि विकासाकडे त्यांचे लक्ष केंद्रित करत आहेत आणि रसायन क्षेत्रात एआय/एमएल टूल्सचा वापर करण्यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उपाय शोधत आहेत, हे पाहून आनंद होतो. यातून भारतीय कंपन्यांची तांत्रिक क्षमता सिद्ध होते.”

हेबरचे सीईओ विपिन राघवन म्हणाले, “प्रयोगशीलता हा हेबर  चा नेहमीच गाभा राहिला आहे. मग ते एलिक्साच्या माध्यमातून प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एआय/एमआयचा समावेश करणे असो किंवा कैझनच्या माध्यमातून डेकल मॅचिंग करत ट्रीम लॉस कमीत कमी करणे असो. आमच्या ग्राहकांना शक्य तितके सर्वोत्कृष्ट सोल्यूशन्स उपलब्ध करून देणे हे आमची प्रयोगशाळा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.” ते पुढे म्हणाले, “प्रत्येक उपयोगासाठी विश्लेषणात्मक सेन्सर्स तसेच कमाल रसायनशास्त्राचा विकास करून त्याला आमच्या एलिक्सासारख्या उत्पादनांची जोड देणे, यातून हे साध्य होईल.”

अलीकडील घडामोडींसह, जागतिक स्तरावर प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाला उच्च दर्जाच्या सेवा प्रदान करण्याच्या आपल्या उद्दिष्टाला बळ देण्यासाठी एक मजबूत टीम आणि ग्राहकसंख्या तयार करण्याची हेबरची योजना आहे. ऑटोमेशनमुळे झालेल्या प्रगतीला चालना देण्यासाठी प्रयोगशाळेची निर्मिती हे याचे उत्तम उदाहरण आहे.

आतापर्यंत हॅबरने अॅक्सेल, एलिव्हेशन कॅपिटल, अॅक्सेंट कॅपिटल, बीनेक्स्ट, टेमासेकचे भागीदार आणि ग्रे ऑरेंजचे संस्थापक मुकुल चावला यांच्याकडून २ कोटी ७० लाख डॉलरची गुंतवणूक उभी केली आहे.