पुण्यातील उंच इमारतींना आगीपासून सुरक्शित करण्यासाठी फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट महत्वाची

100

पुणे :  आर्थिक वाढीसह, पुण्यासारख्या प्रमुख शहरांच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल होत आहेत. राहणीमानातील हा बदल आणि पुण्यातील मध्यम/उच्च इमारतींची वाढती संख्या यामुळे फायर इव्हॅक्युएशनची चिंता वाढली आहे. पहिल्या सात प्रमुख शहरांमढील पुणे शहरात घरांच्या विक्रीत तिमाहीत सर्वाधिक १३ टक्क्याची वाढ नोंदवली गेली. Q3 2022 मध्ये 14,100 निवासी युनिट्स विकल्या गेल्याने, पहिल्या सात शहरांमधील एकूण घरांच्या विक्रीत पुण्याचा वाटा 16 टक्के होता.  एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना प्रश्न असा आहे की, पुण्यातील सर्व उंच इमारती फायर इव्हॅक्युएशन रेडी आहेत असे आपण म्हणू शकतो का?

शहराच्या वाढत्या उन्नती सोबत अग्निशमन दल आणि शहरातील नागरिकांसमोर फायर इव्हॅक्युएशन हि गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सुधारात्मक फायर इव्हॅक्युएशन सिस्टमच्या अभावामुळे शहराच्या अग्निसुरक्षेवर प्रचंड ताण पडत आहे.

डॉ. विक्रम मेहता (महाराष्ट्राचे फायर इव्हॅक्युएशन मॅन म्हणून ओळखले जाणारे) म्हणतात, “आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही अग्निशमन दलासाठी ७० मीटरपेक्षा जास्त उंच इमारतींमधील लोकांना वेळेवर बाहेर काढण्यासाठी मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट आहे जी वरच्या मजल्यावर जलद आणि सुरक्षित पोहोचावू शकते. हे एकमात्र असे सोलुशन आहे कि ज्याने लोकांचे प्राण आणि मालमत्ता दोन्ही वाचवता येऊ शकतात. हे सुनिश्चित करते की आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत निर्वासन प्रक्रिया हि योग्य वेळी होईल. फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट ही विशेष लिफ्ट आहे जी कमीतकमी 2 तास आग-प्रतिरोध करण्यासाठी आणि पॉवर बिघाड झाल्यास बॅटरी बॅकअप वरती चालण्यासाठी डिझाइन केली आहे. बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवल्या तर उंच इमारतीतील रहिवासी खऱ्या अर्थाने सुरक्षित राहू शकतात.  फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट चा उपयोग उर्वरित वेळेत सामान्य लिफ्ट म्हणून करता येतो.”