पुणे (महाराष्ट्र) : पुण्यामध्ये राहणारा नील जोशी व्यावसायिक पोकरच्या उच्चभ्रू विश्वामध्ये अनोळखी नाही. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशाचा प्रमाणित ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या २५ वर्षीय नील जोशीने आता २९ मार्च २०२३ पासून सुरू झालेल्या नॅशनल पोकर सिरीज इंडियाच्या तिसऱ्या पर्वावर लक्ष केंद्रित केले आहे.
लास वेगासमधील वर्ल्ड सिरीज ऑफ पोकर, तसेच व्हिएतनाम व कोस्टा रिकामधील इव्हेण्ट्स अशा जगभरातील स्पर्धांमध्ये खेळण्याच्या आपल्या अनुभवाचा फायदा घेत नीलला विश्वास आहे की, तो या स्पर्धेचे बक्षीस जिंकण्यासाठी तगडी स्पर्धा देऊ शकतो. ८०० हून अधिक इव्हेण्ट्समध्ये भाग घेतलेला नील प्रभावी सात स्पर्धांमध्ये विजयी ठरला आहे आणि इतर २६७ जणांमध्ये सामील आहे, ज्यामुळे तो प्रबळ खेळाडू बनला आहे.
नीलसाठी पोकर फक्त गेम नाही, तर धोरणात्मक कला प्रकार आहे, ज्यासाठी कौशल्य व शिस्तबद्धतेची गरज आहे. तो म्हणाला, ‘‘नॅशनल पोकर सिरीज इंडिया पोकरसंदर्भात असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते आणि गेमप्रती लोकांचा समज बदलत भारतीयांना पोकर कौशल्य-आधारित खेळ असल्याची जाणीव करून देत आहे. भारतातील पोकर स्पर्धांच्या बाबतीत नॅशनल पोकर सिरीज इंडिया सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि मी यंदा या स्पर्धेत स्पर्धा करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.’’
यंदा नॅशनल पोकर सिरीज इंडियाने पुणे सारख्या शहरांसह देशभरातील सहभागींचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामधून प्रदेशातील या खेळाची वाढती लोकप्रियता दिसून येते. २९ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत पोकरबाझीवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अव्वल स्थानावर आलेल्या चॅम्पियन्सना ३२४ पदके दिली जातील. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी https://nationalpokerseries.in/ येथे भेट द्या.