खराडी (पुणे) येथील इ ऑन पार्क येथील एका सॉफ्टवेअर व्यावसायिका कडे तब्बल पाच ५ कोटी खंडणी प्रकरणी सोलापूरच्या दोन “कथित पत्रकारांना पोलिसांनी पाटस (ता. दौंड) टोल नाक्यावर गुरुवारी (ता. १८) चार वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
BIG BREAKING NEWS : सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या; ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर WATCH VIDEO
यावेळी खंडणीखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर आरोपींना पकडण्यासाठी साठी पोलिसांनी प्रतिउत्तर देण्यासाठी गोळीबार करावा लागला आहे.
झेरॉक्सचं दुकान दाखवतो म्हणत प्रवाशासोबत भयानक कांड; नागरिकांमध्ये दहशत, वाचा नेमकं काय घडलं?
महेश सौदागर हनमे (रा. सोलापूर) आणि त्याचा साथीदार दिनेश हनमे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलोसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिक यांच्याकडे आरोपींनी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तर आतापर्यंत व्यावसायिकाने त्यांना 3 लाख 80 हजार रूपये दिलेले आहेत.
त्यानंतरही आरोपी महेश हनमे याच्याकडून व्यवसायिकाकडे वेळावेळी पैशाची मागणी होत होती. हनमे हा स्वतः पत्रकार असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वगेवगळया खोटया बातम्या तयार करून त्या बातम्या व्हॉट्सॲपवर विविध लोकांना पाठवून पोलिस केस करण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, आरोपी महेश हनमेने व्यावसायिकास कुठल्याही परिस्थिती 50 लाख रूपये हवे आहेत अशी धमकी दिली होती. त्यासाठी त्याने त्यांना सोलापूर जिल्हयातील मोहोळ येथील हॉटेल स्वराज येथे बोलावले होते. व्यावसायिकाने याबाबतची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली होती.
त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण आणि इतर पोलिस अंमलदार हे आरोपींच्या मागावर मोहोळकडे रवाना झाले. पोलिसांनी पाटस टोलनाक्यावर सोलापूर येथील पत्रकाराची एमएच १३ न्युज सोलापूरकरांच्या हक्काचं असा लोगो असलेली गाडी थांबवण्याचा प्रयत्न करीत होते.
मात्र या पत्रकाराच्या गाडीच्या वाहन चालकांनी गाडी न थांबवता पोलिसांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आरोपींवर गोळीबार केला. गोळया गाडीच्या पाठीमागील टायरवर लागल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करून जॉईन करा..! https://chat.whatsapp.com/FScfXHDJHL22NadqZHQPdI