पुणे : पुण्याचा सुमेध जोशी बसणार कोण होणार करोडपतीच्या हॉट सीटवर. सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘आता मागे नाही राहायचं’, असं सांगत ’कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम स्पर्धकांसाठी एक नाही तर तब्बल २ करोड रुपये जिंकण्याची संधी घेऊन आला आहे. म्हणजेच ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम दुप्पट झाली आहे.
प्रश्नोत्तरांच्या या मनोरंजक खेळात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचे दमदार निवेदन आणि दिलखुलास संवादकौशल्य प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. पुण्याचा सुमेध जोशी ६ आणि ७ जून रोजी हॉट सीटवर बसणार आहे. तेव्हा पहायला विसरु नका ‘कोण होणार करोडपती’ सोम. ते शनि., रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
सुमेध जोशी यांनी आपले बी-टेक इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण पूर्ण करत आहे. सुमेध ला लहानपणापासूनच सामान्य ज्ञान जोपासण्याची आवड आहे. प्रश्नमंजुषा सोडवण्याची त्याला आधीपासून आवड. कॉलेजमध्ये असताना सुमेध ने अनेक प्रश्नमंजुषा स्पर्धेत पारितोषिक पटकावले.
अनेक स्पर्धेत त्याने पुण्याचे प्रतिनिधित्व केले आणि पारितोषिक पटकावून पुण्याचे नाव चमकावले. आता कोण होणार करोडपती च्या हॉट सीटवर आल्यावर सुमेध कशाप्रकारे खेळतो आणि करोडपती व्हायचे त्याचे स्वप्न पूर्ण करतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आता हॉट सीटवर आल्यावर सुमेध जोशी कसा आणि किती रक्कम जिंकून जातो हे पाहणे पुणेकरांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. सुमे ला नव्या पर्वात हॉट सीटवर येण्याची संधी मिळाली आहे. आता या संधीचा त्या कशा प्रकारे वापर करतात आणि किती पैसे जिंकतात, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
तेव्हा पाहायला विसरू नका कोण होणार करोडपती मंगळवार आणि बुधवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर.