पुणेस्थित ऍग्रीटेक फर्म फार्मईआरपी मधील कर्मचाऱ्यांनी अनाथाश्रमाला दिल्या  भेटवस्तू, आणखी सहकार्याचा हात देण्याचे आश्वासन  

99
पुणे, २१ मार्च २०२३, फार्मईआरपीची पालक कंपनी असलेल्या शिवराय टेक्नॉलॉजीज या सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या स्मार्ट कृषी इआरपी  प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या कंपनीने  निरंकार बालग्राम अनाथाश्रमातीळ मुलांना भेट देऊन त्यांच्या  कर्मचार्‍यांच्या समवेत आपला स्थापना दिवस साजरा केला. वंचित मुलांना आधार देण्याच्या आपल्या मोहिमेचा एक भाग म्हणून  फार्म ईआरपीने निरंकार बालग्राम अनाथाश्रम, पुणे येथे मुलांच्या पोषण आणि दैनंदिन गरजांसाठी किराणा आणि शैक्षणिक साहित्य संच दान केले.
Employees from Pune-based AgriTech firm FarmERP donate gifts to the orphanage, promise more support
देणगी वस्तूंमध्ये किराणा सामान, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि शैक्षणिक संच यांचा  समावेश होता. अशा स्वरूपाची  भेट या  वंचित मुलांचे मनोबल वाढवते. कारण त्यांच्याकडे सतत लक्ष पुरवणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते. फार्म ईआरपीच्या  कर्मचाऱ्यांनाही अनाथाश्रमात सर्वांशी संवाद साधताना खूप वेगळा अनुभव मिळाला. गाणी  आणि नृत्य सादरीकरणासह हि मुलेही या आनंदात सामील झाली होती
फार्मईआरपीचे सीईओ आणि सह-संस्थापक श्री संजय बोरकर म्हणाले, “ हा केवळ कंपनीचा उपक्रम नव्हता तर त्यात कर्मचाऱ्यांचा पुढाकारही होता अशा  उपक्रमाद्वारे आम्ही  वंचित मुलांपर्यंत पोहचू. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीस पुस्तके आणि स्टेशनरी उपलब्ध होईल अशी आशा आहे. या उद्देशाला पाठिंबा देण्यासाठी आणि  या अमूल्य अशा उपक्रमासाठी योगदान देताना सढळ हस्ते दान केल्याबद्दल आम्ही आमच्या सर्व कर्मचारी आणि भागीदारांचे आभारी आहोत.आम्ही आमच्या व्यवसायाच्या माध्यमातून जे करतो , ज्या समुदायांमध्ये राहतो आणि या उपक्रमांद्वारे कार्य करतो त्या समुदायांवर सकारात्मक प्रभाव पडण्याची आम्हाला आशा आहे असेही ते पुढे म्हणाले.

फार्मईआरपी हे कृषी उद्योगातील एक बुद्धिमान आणि नव्या पिढीचे  पिढीचे फार्म मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आहे जे भविष्यासाठी विविध घटक आणि भागधारकांना जोडण्यासाठी सज्ज आहे. कृषी आणि कृषी व्यवसायाचे तंत्रज्ञानधिष्ठीत  परिवर्तन हे त्याचे उद्दिष्ट आहे.  कंपनीने आफ्रिका, युरोप, मध्य पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये आपले सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आहे, सुमारे ३० देशांमध्ये १ .५ दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांना आणि  ६.७५ लाख एकर शेतात सेवा देण्यासाठी मदत केली आहे.