पावसाचं पुन्हा कमबॅक! राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

226

मागील काही आठवड्यांपासून राज्यातील पाऊस पुर्णपणे गायब झाला आहे.

राज्यातील अनेक भागातील पाऊसाचे प्रमाण फार कमी आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मागील आठवड्यापासून राज्यात पावसाने पुर्णपणे उघडीप दिल्यानंतर आता पाऊसाला पोषक हवामान तयार झालं आहे.

जुलै महिन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होत पाऊस पुर्णपणे उघडला आहे. आज मुंबई, पुण्यासह विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

आज नागपूर, अकोला, अमरावती, वाशिम, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि बुलढाणा अशा 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या 11 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वरील सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

मात्र वातावरणात विजा चमकण्याचं प्रमाण जास्त असू शकतात. त्यासोबतच पुढील आठवड्यांपासून राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

आकाशात विजा चमकत असताना कोणीही घराबाहेर पडू नका असा सल्लाही हवामान खात्याच्या तज्ञांकडून देण्यात आला आहे. उद्याही राज्यात आजच्यासारखी ढगाळ स्थिती राहणार असून वरील सर्वच जिल्हांमध्ये उद्यासाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.