पारंपारिक आभूषणावर आधारित एस. एस. नगरकर ज्वेलर्स पुणे यांचे श्री रुक्मिणी  कलेक्शन सादर

57
Shree Rukmini Collection by Nagarkar Jewelers Pune

पुणे : सोन्याच्या दागिन्यामध्ये पारंपारिक आभूषणाची आवड असणार्‍यासाठी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल  रुक्मिणी  मूर्तींच्या अध्यात्मिक कल्पना आणि रचना  मायथॉलॉजीवर प्रेरित होवून मुर्तीवरील कोरलेल्या पौराणिक छायचित्रांवर आधारित श्री रुक्मिणी कलेक्शन 50 वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या एस. एस. नगरकर ज्वेलर्सतर्फे  सादर करण्यात आले आहे. 

Shree Rukmini Collection by Nagarkar Jewelers Pune

श्री रुक्मिणी  कलेक्शनमध्ये पुतळीहार, मासोळ्या, बाजूबंद, मंगळसूत्र, लक्ष्मी हार, चंद्रहार राणीहार, विविध कंगन, झुमके नथ, नथनी इत्यादींचा समावेश असून पारंपारिक दागिन्याची आवड लक्षात घेऊन या दागिन्यांचे डिझाईन करण्यात आले आहे. या कलेक्शनचे अनावरण पत्रकार परिषदेत एस. एस. नगरकर ज्वेलर्सचे संचालक प्रसाद नगरकर, वसंत नगरकर, पुष्कर नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले असून हे आभूषण एस. एस. नगरकर यांच्या दुकानात ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

याप्रसंगी बोलताना प्रसाद नगरकर म्हणाले की, आम्ही एस एस नगरकर ज्वेलर्सच्या माध्यमातून चेन्नई, केरळ, कर्नाटका येथील मंदीर आणि मुर्तींच्या अध्यात्मिक कल्पना आणि रचना माथॉलॉजीवर प्रेरित होऊन पारंपारिक आभूषण चाहत्यांसाठी दागिने बनविले जात होते. आता यासोबत महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठल  रुक्मिणी  मंदीर आणि मूर्तींपासून प्रेरित होऊन  800 ते 1200 कालावधीतील वापरात असलेले रोजच्या आणि सणासुदीच्या दागिन्याचे छायाचित्र पाहून श्री  रुक्मिणी  कलेक्शनच्या माध्यमातून प्रथमच नवीन कलेक्शन ग्राहकांसाठी आणले आहे. या कलेक्शनद्वारे आपल्या समृद्ध परंपरा व नात्यातील दृढता, प्रेम जपण्याचा प्रयत्न केला आहे.

वसंत नगरकर म्हणाले, श्री  रुक्मिणी  कलेक्शन सादर करण्यापुर्वी आम्हाला सुमारे सात वर्ष विविध छायाचित्रांचा आणि मंदीरांचा अभ्यास करावा लागला. त्यानंतर श्री रुक्मणी कलेक्शन अंतर्गत पारंपारिक दागिने तयार केले असून 25 ग्रॅम पासून अडीचशे ग्रॅम पर्यंत ग्राहकांना फक्त एस. एस. नगरकर ज्वेलर्समध्ये उपलब्ध होतील. 

आमच्या अनुभवी कारागीरांनी माणिक, पाचू,  हिरे, पोलकी डायमंड, याचा सुयोग्य वापर करून पारंपारिक आभूषणात पुतळीहार, मासोळ्या, बाजूबंद, मंगळसूत्र, लक्ष्मी हार, चंद्रहार राणीहार, विविध बांगड्या, झुमके, नथ, नथनी घडविले आहेत. विशेष म्हणजे श्री रुक्मिणी कलेक्शन अवघ्या दोन महिन्यासाठी ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच जर कोणास पौराणिक छायाचित्राच्या माध्यमातून दागिने बनवून हवे असतील तर ते ही बनविले जातील.