पाइन लॅब्ज (Pine Labs) द्वारे कार्ड ॲक्सेप्टन्ससह एक क्यूआर (QR)-फर्स्ट उपकरण मिनी (Mini) सादर

34

एक अग्रगण्य व्यापारी वाणिज्य सर्वचॅनल प्लॅटफॉर्म, पाइन लॅब्ज (Pine Labs) ने एक क्रांतिकारक क्यूआर (QR) आणि कार्ड ॲक्सेप्टन्स कार्ड स्वीकृती उपकरण मिनी (Mini) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हे उपकरण नियमित पॉईंट ऑफ सेल (पीओएस-PoS) टर्मिनलच्या किंमतीच्या जवळजवळ एक तृतीयांश किंमतीवर उपलब्ध होण्याची अपेक्षा असून, लहान व्यापाऱ्यांसाठी पाईन लॅब्स मिनी (Pine Labs Mini) हा एक आदर्श उपाय आहे.

भारतातील बहुतेक पीओएस (PoS) उपकरणे डेबिट/क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी तयार केली जातात. प्रथमच, पाइन लॅब्स (Pine Labs)ने भारतात एक असे क्यूआर (QR)-फर्स्ट आणि कार्ड टॅप कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स उपकरण सादर केले आहे, जे एसएमईज (SMEs)साठी तयार करण्यात आले आहे. या किफायती उत्पादनामुळे भारतात डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

या लॉन्चवर भाष्य करताना, पाइन लॅब्स (Pine Labs) चे सीआरओ (CRO) नवनीत नक्रा म्हणाले की, “क्यूआर (QR) आधारित आणि कार्ड टॅप पेमेंट्स हे भारतीय ग्राहकांसाठी उत्तम उपाय आहेत. व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून, एक परिपूर्ण वेगवान चेकआउट अनुभव आणि पॉईंट-ऑफ-सेल डिजिटायझेशनमधील खर्चातील अडथळा दूर करणे आवश्यक बाबी आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी, क्यूआर (QR)-फर्स्ट, कार्ड स्वीकार करणारे, किफायतशीर पीओएस (PoS) उपाय, पाईन लॅब्स मिनी (Pine Labs Miniचे लॉन्च करताना आम्हाला आनंद होत आहे.”

भारतातील सध्या सुरू असलेल्या डिजिटल पेमेंट्स क्रांतीमध्ये पाइन लॅब्स (Pine Labs) आघाडीवर असून व्यापाऱ्यांना त्यांच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण पेमेंट उपाय प्रदान करत आहेत. एक टेक-फर्स्ट ऑर्गनायझेशन म्हणून, तिने व्यापारी वर्गाच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी नवकल्पना सुरू ठेवल्या आहेत.