पुणे: २४ जून २०२३ : दिल्ली, हैद्राबाद, बेंगळुरू आणि अगदी अलीकडे मुंबईत लाभलेल्या उत्स्फूर्त यशानंतर, अजय चौधरी यांचे जस्ट अस्पायर: नोट्स ऑन टेक्नॉलॉजी, एंटरप्रेन्युअरशिप अँड द फ्युचर या आवृत्तीचे अनावरण २४ जून रोजी पुण्यात एका कार्यक्रमात होणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य पर्सिस्टंट सिस्टीम्सच्या वतीने प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आले.
भारतातील हार्डवेअरचे जनक डॉ. अजय चौधरी यांचे जीवनचरित्र
तिसर्या प्रिंट रनमध्ये असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन प्रख्यात शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण प्राप्त डॉ. आर. ए. माशेलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. देवांग मेहता सभागृहात शेकडो इच्छुक तरुण आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या उपस्थितीत डॉ. अजय चौधरी डॉ. माशेलकर यांच्याशी गप्पा मारतील.
एचसीएल’च्या संस्थापकांपैकी एक (१९७५ मध्ये भारतातील सर्वात सुरुवातीच्या स्टार्ट-अपपैकी एक) डॉ. चौधरी यांचा उल्लेखनीय प्रवास या पुस्तकात मांडला आहे, ज्यांना आज ‘फादर ऑफ हार्डवेअर’ म्हणून ओळखले जाते. हे थक्क करणारं संकलन ‘एव्हरीथिंग टेक्नोलॉजी’ सूत्रावर आधारीत असून डॉ. अजय चौधरी यांच्या उल्लेखनीय प्रवासाचे वर्णन करते. या क्षेत्रातील सर्व इच्छुक तरुण व्यावसायिकांसाठी ही शब्दाकृती हा एक बूस्टर डोस म्हणून काम करेल.
डॉ. अजय चौधरी म्हणाले, “भारताच्या विकासात अर्थपूर्ण योगदान देण्याच्या माझ्या आत्मकेंद्री लक्ष्याने मला आज मी जिथे आहे तिथवर पोहोचण्यास मदत केली. मी तरुणांकडे पाहताना आणि आजच्या तरुण भारतीयांशी चर्चेत मग्न असताना, ती ‘पोटातली आग’ खूप दिसते. आपला देश सर्वात उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असल्याचा आत्मविश्वास मला मिळतो. यापूर्वी कधीही विचार केला नव्हता असा पराक्रम साध्य करा.”