न्यूट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान यांच्या हेल्थ पुस्तकाचे प्रकाशन

89
Publication of Nutritionist Mugdha Pradhan's Health Book

पुणे  :  आहारतज्ज्ञ, न्यूट्रिशनिस्ट आणि आय थ्राईव्ह (iThrive)कंपनीच्या संस्थापक व सीईओ मुग्धा प्रधान यांनी लिहीलेल्या ‘हेल्थ, आयएनसी : १०  रिअल लाईफ स्टोरीज दॅट विल मेक यू क्वेश्चन दी एंटायर मॉडर्न हेल्थकेअर सिस्टीम’ या पुस्तकाचे २५ मार्च रोजी औंधमधील व्हाईट हाऊस येथे प्रकाशन झाले. या पुस्तकात दहा व्यक्तींच्या केस स्टडीज मांडण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांच्या आरोग्यांच्या समस्यांनंतर त्यांनी आपल्या जीवनशैलीत सुधारणा केल्या. पोषक आहारावर भर असणाऱ्या या आरोग्यदायी सुधारणांमुळे त्यांचे आरोग्य सुधारले आणि आयुष्य निरोगी, निरामय झाले.

या पुस्तकात, मुग्धा प्रधान यांनी वाचकांना आपल्या जीवनप्रवासाचीही थोडक्यात ओळख करून दिली आहे. मुग्धा यांनी फार लहान वयात आपल्याकडे लोकांना बरे करण्याची आणि मदत करण्याची नैसर्गिक क्षमता आहे याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी आरोग्यासाठी लाभदायी औषधांचा अभ्यास केला आणि स्वतःचे आरोग्य आणि जीवनही सुधारले. त्यानंतर आपल्या ज्ञानाचा वापर त्यांनी सभोवतालच्या लोकांना बरे करण्यासाठी केला. यापैकी दहा व्यक्तींचे अनुभव या पुस्तकात वर्णन केले आहे. मुग्धा यांनी आपल्या ज्ञानाचा, औषधींचा वापर करून त्यांच्या आरोग्यामध्ये अमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. त्याबाबत या पुस्तकात सखोल माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या दहा व्यक्तींचे आरोग्य आणि जीवनशैली याबद्दल विस्तृत माहिती यात देण्यात आली आहे. त्यांच्या सम्यस्यांवर फंक्शनल औषधे प्रत्यक्षात कशी कार्य करतात आणि रूग्णांच्या दीर्घकालीन आजारांतून बरे होण्यास कशी मदत करतात, याची माहिती देण्यात आली आहे.

या पुस्तकाविषयी बोलताना, मुग्धा प्रधान म्हणाल्या, “हे पुस्तक केवळ २०२१ पर्यंतच्या माझ्या कामाची कथा सांगत नाही, तर यात त्या लोकांच्या कहाण्या आहेत, ज्यांनी स्वतः आपल्या आरोग्याबाबत जागरुकता दाखवली आणि स्वतः मध्ये अंतर्बाह्य बदल केले. मला आनंद आहे, की मी आरोग्याच्या क्षेत्रात योगदान देऊ शकत आहे आणि लोकांना आरोग्याशी तडजोड न करता निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत करण्यात एक दुवा ठरले आहे. सर्वांगीण आरोग्याच्या दिशेने सुरू असलेल्या त्यांच्या प्रवासात एक छोटीशी भूमिका निभावल्याचा मला आनंद आहे.”

Publication of Nutritionist Mugdha Pradhan's Health Book

 पोषणमूल्ययुक्त आहार आणि पूरक औषधी हे आजच्या काळात उपलब्ध असलेल्या भेसळविरहित वैद्यकीय संशोधनाचे सर्वांत शुद्ध प्रकार आहेत. भ्रष्ट राजकीय आणि आर्थिक शक्तींमुळे कलंकित होत असलेल्या पारंपरिक वैद्यकीय व्यवस्थेपासून आणि तीव्र औषधांवरील अवलंबित्वापासून मुक्त आहेत.

उपचार करणे कठीण असलेल्या दीर्घकालीन आजारांपासून कायमस्वरूपी मुक्तता होण्यासाठी, पोषक आहार पद्धतीत अत्याधुनिक प्रगत वैद्यकीय चाचण्यांचाही समावेश होतो. रुग्णांना पूर्णपणे बरे करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठीचे हे उपचार औषधमुक्त आहेत. आहार व जीवनशैलीतील बदल ते वनस्पती-आधारित औषधे आणि डिटॉक्स पद्धतींपर्यंत सर्व गोष्टींचा यात वापर केला जातो.

 जगभरात सिद्ध झालेली ही पुराव्यांवर आधारित पर्यायी उपचार पद्धती असून आणि जगातील प्रमुख वैद्यकीय व्यावसायिकांनीही तिचा स्वीकार केला आहे.