पुणे, २४ डिसेंबर २०२२ : बिग बी अमिताभ बच्चन हे नेक्सस मॉल्सचे ‘हॅपीनेस अॅम्बेसेडर’असल्याची घोषणा कंपनीने अलिकडेच केली. त्यानंतर नेक्सस मॉल्सने या सणासुदीच्या हंगामासाठी अमिताभ बच्चन यांनी काम केलेला डिजिटल जाहिरातपट प्रदर्शित केला आहे. या डिजिटल जाहिरातीत अमिताभ बच्चन एका नेक्सस मॉल्समध्ये सुंदर जांभळा ड्रेस निवडण्यात मदत करताना दिसत आहेत. या सणासुदीच्या हंगामासाठी नेक्सस मॉल्सने अमिताभ बच्चन यांच्यासह एक भव्य जाहिरात मोहिम आखली असून, ही डिजिटल जाहिरात त्याचाच एक भाग आहे.
या जाहिरातपटाची निर्मिती ‘कॉर्कोइस’ कंपनीने केली असून, प्रसून पांडे यांनी दिग्दर्शन केले आहे. तर याची लक्षवेधक पटकथा अनुराग अग्निहोत्री आणि पियुष पांडे यांनी लिहीली आहे. नेक्सस मॉल्सने आपली जाहिरात मोहीम विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे हा जाहिरातपट डिजिटल तसेच टीव्ही चॅनेल्सवरही उपलब्ध आहे. प्रिंट माध्यमातूनही नेक्सस मॉल ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे.
या जाहिरात मोहिमेबाबत बोलताना नेक्सस मॉल्सचे सीएमओ निशंक जोशी म्हणाले, “आम्ही आमचा ब्रँड मजबूत करत असताना ही मोहीम आम्हाला आमच्या ग्राहकांच्या मनात आमचे स्थान आणखी पक्के करण्यास मदत करेल. याची आम्हाला खात्री आहे. नेक्सस मॉल्सला भेट देणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक वेळी ‘अब हर दिन कुछ नया’ अनुभव देण्याच्या आमची वचनबद्धतेची साक्ष अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या या जाहिरात मोहिमेतून मिळते.