नेक्सस पॅव्हिलियन आणि वेस्टएंड मॉल्स तर्फे नेक्सस ग्रॅब सादर

72

पुणे, ८ डिसेंबर २०२२ : भारतातील अनेक शहरांमध्ये मॉल्स चालवणारी देशातील सर्वात मोठी मॉल्स कंपनी नेक्सस मॉल्सने आपल्या ग्राहकांसाठी नेक्सस ग्रॅब हा अनोखा उपक्रम सादर केला आहे.

ही मॉल्सची एक वेब आधारित गेमिफाइड आवृत्ती आहे ज्याद्वारे ग्राहक आपल्या स्मार्टफोन वरून शहरातील नेक्सस मॉल्समधील स्पेशल डील्स आणि सवलतींबद्दल जाणून घेऊन त्यांचा लाभ घेऊ शकतील.

हा गेम सर्व वयोगटातील लोकांसाठी खुला आहे – वापरकर्त्यांनी खेळणे सुरू करण्यापूर्वी आणि विशेष ऑफर मिळवण्यापूर्वी त्यांना फक्त क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक आहे.

नेक्सस ग्रॅब हे अशा प्रकारचे पहिले गेमिफिकेशन आहे जे ग्राहकांना अशा प्रकारची खास सुविधा देते, जी शहरातील इतर कोणत्याही मॉलने आतापर्यंत ग्राहकांना दिली नाही.

नेक्सस मॉल्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर निशांक जोशी म्हणाले, ’’नेक्सस मॉल्समध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांना एक अनोखा अनुभव देण्याचा सतत प्रयत्न करत असतो. नेक्सस ग्रॅब हा एक असाच एक अनोखा उपक्रम आहे, शहरात यापूर्वी असा उपक्रम राबवला गेला नव्हता आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या ग्राहकांना ते नक्की आवडेल.”