‘नॅशनल चिकन डे’ उत्साहात साजरा

71

पुणे, १६ नोव्हेंबर २०२२ : भारतीय कुक्कुटपालनाचे जनक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित देशव्यापी जनजागृती अभियानांतर्गत ‘नॅशनल चिकन डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘चिकन डे’च्या निमित्ताने शहराच्या विविध भागातील १०० पेक्षा अधिक दुकानांतून १८, १९ व २० नोव्हेंबर २०२२ या तीन दिवशी १० टक्के सवलतीत चिकन वितरित करण्यात येत आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील वेंकीज एक्स्प्रेस येथे पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी असोसिएशनचे संजय थोपटे, वेंकीज एक्सप्रेसचे किरण गुंजाळ आदी उपस्थित होते.

वसंतकुमार म्हणाले, “सुदृढ आरोग्यासाठी चिकन पोषक आहे. त्यातून मिळणारे प्रोटीन लाभदायक असतात. आठवड्यातून पाच-सहा वेळा चिकन खाल्ले, तर आपली प्रतिकार क्षमता चांगली राहते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी चिकन खावे, यासाठी जनजागृती केली जात आहे. लोकांमध्ये चिकनबाबत जागृती होण्याच्या उद्देशाने आज हा विविध राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने दिवस साजरा होत आहे. तीन दिवस ७५ दुकानातून स्वस्त दरात चिकन विक्री, जागृतीपर कार्यक्रम, प्रशिक्षण आदी उपक्रमांचे आयोजन या अभियानात केले आहे.”

किरण गुंजाळ म्हणाले की, चिकनमधून प्रोटिन्स भरपूर प्रमाणात मिळतात, जे आपल्या शरीरासाठी पोषक असते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चिकन, अंडी उपयुक्त आहे. लोकांनी मनात कोणतीही भीती न ठेवता चिकनचे सेवन करावे. आज नॅशनल चिकन डेच्या निमित्ताने आम्ही ग्राहकांना सवलत देत असल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे.”