वसंतकुमार म्हणाले, “सामान्य नागरिकांमध्ये चिकन बाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येत आहे. पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर असोसिएशन महाराष्ट्र, कर्नाटक पोल्ट्री फार्मर्स ब्रीडर्स असोसिएशन, पश्चिम बंगाल पोल्ट्री फेडरेशन तसेच इतर अनेक राज्य पोल्ट्री असोसिएशन तर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वस्त दरात चिकन विक्री, जागृतीपर कार्यक्रम, व्याख्यान, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन या जागृती अभियानात करण्यात येत आहे.”
पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन अर्थात कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादक संघ महाराष्ट्र, ही संस्था गेल्या दोन दशकांपासून कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत आहे. जवळपास १०० हून अधिक कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादक संस्थेचे सभासद आहेत. संस्थेच्या सभासदांकडुन एकत्रितपणे महिन्याला चार कोटी ब्राॅयलर प्लेसमेंट केली जातात. जवळपास गेली दोन दशके संस्था, अव्याहतपणे कुक्कुट पालक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम करत आहे. राज्य तसेच केंद्र सरकारपुढे सभासदांचे प्रतिनिधित्व संस्था करते.
भविष्यातही असे उपक्रम वारंवार आयोजिले जाणार असून, चिकन सप्ताह देखील साजरा करण्याच्या विचारात आहोत. यासह चिकनचे भाव कमी जास्त होतात, त्यावेळी जे दुकानदार ग्राहकांना त्याप्रमाणात चिकन उपलब्ध करून देतात, अशा दुकानदारांचा असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. असे अनेक दुकानदार पुण्यातील काही भागात सर्वेक्षण करताना निदर्शनास आले आहेत, असेही असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.