निबाव होम लिफ्ट्सकडून पुण्‍यामध्‍ये जगातील सर्वात मोठ्या पॅनोरॅमिक केबिनने युक्‍त सिरीज III मॅक्‍स एलीव्‍हेटर लाँच

42

पुणे : निबाव होम लिफ्ट्स या भारतातील सर्वात मोठ्या होम लिफ्ट ब्रॅण्‍डने आज पुण्‍यामध्‍ये जगातील सर्वात मोठ्या पॅनोरॅमिक केबिनने युक्‍त त्‍यांची बहुप्रतिक्षित सिरीज III मॅक्‍स एलीव्‍हेटरच्‍या लाँचची घोषणा केली. नवीन होम एलीव्‍हेटरमध्‍ये वापरकर्त्‍यांचा अनुभव वाढवण्‍यासाठी, ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आणि एलीव्‍हेटर तंत्रज्ञानाच्‍या क्षमतांना पुनर्परिभाषित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली अनेक प्रभावी अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये आहेत. सुरक्षितता, टिकाऊपणा व सुलभता यांवर लक्ष केंद्रित करत पेटेण्‍टड फ्यूज लॉकिंग टेक्‍नॉलॉजी (एफएलटी) असलेल्‍या या अत्‍याधुनिक एलीव्‍हेटर इमारतींमध्‍ये व्‍यक्तींच्‍या ये-जा करण्‍याच्‍या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे.

Nibav Homes

२६० किग्रॅ क्षमता असलेल्‍या प्रगत होम लिफ्टसाठी खड्डयाची गरज भासत नाही, ज्‍यामुळे मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्‍याची गरज न भासता नवीन व विद्यमान इमारतींमध्‍ये ही होम लिफ्ट सुलभपणे इन्‍स्‍टॉल करता येते. हे नवोन्‍मेष्‍कार जलद इन्‍स्‍टॉलेशन आणि एकूण कमी प्रकल्‍प खर्चांची खात्री देते. केबिनमध्‍ये अतूट पॉलिकार्बोनेट ग्‍लाससह ३६०-अंश पॅनोरॅमिक व्‍ह्यू आहे, ज्‍यामधून उच्‍च दर्जाची क्षमता, टिकाऊपणा व सुरक्षितता मिळते. हे प्रगत मटेरिअल सुस्‍पष्‍ट दृश्यासह ब्रेकेज किंवा नुकसानाचा धोका कमी असण्‍याची खात्री देते, तसेच वापरकर्त्‍यांना क्‍लासी व लक्षवेधक अनुभव देते.

Nibav Homes

तसेच अधिकतम कार्यक्षमता व स्थिरतेसाठी डिझाइन करण्यात आलेले सेफ्ट-सपोर्टेड वजनाने हलके हायब्रिड शाफ्ट उच्‍च दर्जाची स्थिरता व विश्‍वसनीय रचना देते, ज्‍यामुळे अधिक डिझाइनची भर करण्‍यासोबत जागेच्‍या सानुकूल वापराची खात्री मिळते. सिरीज III मॅक्‍स सिंगल-फेज पॉवर ऑपरेट करण्‍यासाठी देखील डिझाइन करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे ही लिफ्ट ऊर्जा-कार्यक्षम व पर्यावरणास अनुकूल देखील आहे. हे वैशिष्‍ट्य वीजेचा वापर कमी करण्‍यासोबत कार्यसंचालन खर्च देखील कमी करते, ज्‍यामुळे घरमालकांना दीर्घकाळपर्यंत फायदा मिळतो. तसेच सर्वसमावेशकता आणत सिरीज III मॅक्‍स पूर्णत: व्‍हीलचेअरशी सुसंगत आहे, तसेच पूर्णत: तयार घरांमध्‍ये इन्‍स्‍टॉलेशनसाठी देखील सुसंगत आहे.

Nibav Homes

या लाँचबाबत आपले मत व्‍यक्‍त करत निबाव होम लिफ्ट्सचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विमल बाबू म्‍हणाले, सिरीज III मॅक्‍समध्‍ये जगातील सर्वात मोठे न्‍यूमॅटिक एलीव्‍हेटर के‍बिन आहे, जे आमच्‍या मते एलीव्‍हेटर उद्योगातील गेम चेंजर आहे. या क्रांतिकारी मॉडेलमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह सुधारित सुरक्षितता वैशिष्‍ट्ये, उल्‍लेखनीय डिझाइन व अद्वितीय युजर आरामदायीपणा आहे. सुरक्षितता, कार्यक्षमता व ग्राहक समाधानाला प्राधान्‍य देणारी एलीव्‍हेटर सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याप्रती आमची दीर्घकालीन प्रतिष्‍ठा कायम ठेवण्‍याचा आमचा मनसुबा आहे आणि सिरीज III मॅक्‍स एलीव्‍हेटर्स करू शकणाऱ्या कार्यांमधील मर्यादांना दूर करत नवोन्‍मेष्‍कारीप्रती आमच्‍या अविरत समर्पिततेला सादर करते. आमचा विश्‍वास आहे की, प्रगत होम लिफ्ट व्‍हर्टिकल परिवहनाला पुनर्परिभाषित करेल आणि पुण्‍यातील एलीव्‍हेटर्ससाठी नवीन मानक स्‍थापित करेल.