निबाव होम एलेव्हेटर्सचा पुण्यातील घरमालकांसाठी सर्वात सुरक्षित घरगुती लिफ्ट सादर

61
Nibav Home Elevators Enters Pune in a Grand Style

पुणे : भारतातील सर्वाधिक औद्योगिक आणि शैक्षणिक शहरांपैकी एक असलेल्या पुण्यात आज भारतातील एकमेव टीयूडी एसयूडी प्रमाणित घरगुती लिफ्ट ब्रँड असलेल्या निबाव होम एलेव्हेटर्सचा पॅलॅझो कोंडोमिनियममध्ये असलेल्या पुण्यातील एक्स्पीरियंस सेंटरमध्ये निबावच्या सीरीज २, सीरीज ३ आणि सीरीज ३ मॅक्स या सर्वात सुरक्षित आणि सर्वात आकर्षक डिझाईन असलेल्या न्यूमॅटिक होम लिफ्ट म़ॉडेल घरमालकांसाठी सादर करण्यात आल्या आहेत. निबाव होम लिफ्ट या जागतिक पातळीवर प्रमाणित असून त्यांच्या डिझाईनचे पेटेंट मिळविण्यात आले आहे.  त्या अॅडजस्टेबल सॉफ्ट लँडिंग, ड्यूएल एचसीसी ब्रेक्स आणि अनेक प्रकारचे किफायती कस्टमाईजेशन पॅकेजेस अशा प्रगत अभियांत्रिकी उत्कृष्टतेमुळे घरात जवळपास कुठेही बसविता येतात. या उत्पादनांच्या नाविन्यपूर्ण डिझाईनमुळे आणि केवळ २४ तासांच्या आत पूर्ण होऊ शकणारी सुलभ स्थापना यांमुळे घरात कोणतेही जास्तीचे बांधकाम करण्याची गरज उरत नाही.

निबावची नवीनतम सीरीज III  होम लिफ्ट ही जगातील पहिली वायर-मुक्त न्यूमॅटिक होम लिफ्ट असून ती संपूर्णपणे हवेच्या आधारे वर-खाली हालचाल करते. त्यामुळे दोरी, बेल्ट, वायर आणि तेल किंवा ल्यूब्रिकेशन यांचा वापर करण्याची गरज उरत नाही.  


निबाव युरोपियन मानकांनुसार तयार करण्यात आलेल्या होम लिफ्ट्स बसवत असून त्या प्रत्येक घरातील जीवनाचा दर्जा बदलण्याचे काम करतात. त्यामुळे घरमालकांना शाश्वत इको-फ्रेंडली होम लिफ्टचा स्वीकार करणे शक्य होते. व्हीलचेअर किंवा वॉकिंग फ्रेम वापरणारे, प्रियजनांसह प्रवास करू इच्छिणारे, हालचाली मंद झालेले, वैद्यकीय उपचारांनी बरे होणारे, सेवानिवृत्ती, अपंगत्व किंवा गंभीर दम्याचा त्रास यामुळे प्रभावित झालेले यांच्यासाठी सुरक्षित आत आणि बाहेर जाणे शक्य होते. निबावच्या पेटंट केलेल्या होम लिफ्ट पारंपारिक हायड्रॉलिक सिस्टीमपेक्षा कमी उर्जा वापरतात. तसेच त्यांत झिरो सिव्हिल वर्क, सेल्फ-सपोर्टिंग स्ट्रक्चर, ग्रीस लेस टेक्नॉलॉजी आणि व्हीलचेअर कंपॅटिबिलिटी यासारख्या उद्योगातील अग्रगण्यतेची वैशिष्टे आहेत.  


या महत्त्वाच्या घडामोडीविषयी भाष्य करताना श्री विमल बाबू म्हणाले, पुणे विभागातील आमचा प्रवेश हा आमच्या राष्ट्रीय भरभराटीच्या विकासाच्या धोरणावर आधारित आहे. ज्या देशात होम लिफ्ट विभाग अधिक लोकप्रिय होत आहे तेथे हे विशेष महत्त्वाचे आहे. घरमालक हे सुरक्षित, अस्सल दर्जा, मूल्य आणि सुविधा यांच्या शोधात आहेत. आमच्या क्रांतिकारी होम लिफ्ट ही पाचही प्रमुख वैशिष्ट्ये देतात. दर्जा आणि सेवेच्या पातळीवर निबाव मापदंड स्थापित करेल आणि या देशभरात दिल्या जाणाऱ्या होम लिफ्ट सेवांमध्ये सातत्य राखेल, याची मला खात्री आहे.