नितीन म्हस्के खुन प्रकरणात मुद्दाम गोवण्याचा विरोधकांचा प्रयत्न : निलेश आल्हाट

82
RPI - Nilesh Alahat

पुणे १८ ऑगस्ट २०२३ : मंगला टॉकीज समोर १५ ऑगस्टच्या रात्री नितीन मोहन म्हस्के (३५, रा. ताडीवाला रोड) या तरुणाचा अज्ञात टोळक्याकडून तलवार, कोयता, लोखंडी गज आणि दगडाने निघृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेविषयी बोलताना मयताचे वडील श्री. मोहन म्हस्के यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना रिपाई युवक आघाडी कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र निलेश आल्हाट यांचेवर ही हत्या घडवून आणल्याचा प्रथमदर्शनी कुठलाही पुरावा नसताना आरोप केलेला होता.

या आरोपाचे खंडन करण्यासाठी पुण्यातील कार्यरत सर्वपक्षीय संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी असित गांगुर्डे- आर.पी.आय नेते, अशोक शिरोळे- आरपीआय नेते, दत्ता पोळ -नेते भीम आर्मी, जयदेव रणदिवे मा. नगरसेवक पुणे मनपा, विलास कांबळे -अध्यक्ष एम आय एम, बाळासाहेब चौरे- नेते वंचित आघाडी, प्रशांत कसबे- नेते बहुजन समाज पार्टी, सतीश गायकवाड- युवा नेते समता परिषद, संजय सोनवणे- नेते आरपीआय यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.

आपल्या वरच्या आरोपाचे खंडन करताना निलेश आल्हाट म्हणाले नितीन म्हस्के यांच्या जाण्याचे त्यांनाही दुःख आहे परंतु त्या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे आपली बदनामी करून आपल्याला निवडणुकीच्या तिकिटापासून कसे लांब ठेवता येईल याचा विरोधक विचार करीत असल्यामुळे त्यातूनच हा आरोप केला गेला आहे व आपणास या खोट्या केस मध्ये गोवण्याचा प्रयत्न चालू आहे. माझी राजकीय कारकीर्द हेतू पुरस्सर नष्ट करण्याचे व माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे. असेही ते म्हणाले.

तसेच ज्यांनी आरोप केला आहे त्यांचा बोलविता धनी- मास्टर माईंड कोण आहे याचा पोलिसांनी तपास करावा अशी ही मागणी निलेश आल्हाट यांनी याप्रसंगी केली.