नागपूर अधिवेशन दरम्यान आमदार शेखर निकम यांनी मतदार संघातील विविध विषया संधर्भात मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

83

चिपळूण संगमेश्वर मतदार संघातील विकासाठी आवश्यक असणारे प्रश्न हिवाळी अधिवेशनात प्राधान्याने मांडून सोडवण्यासाठी प्रयत्नशील – आमदार शेखर निकम

चालू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान आमदार शेखर निकम यांनी कोकणातील विकास योजना विषयी मा. उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले यामध्ये चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळे, नैसर्गिक ढाबधाबे, विस्तृत सह्याद्री पर्वत रांगा, गड किल्ले, लहान मोठी मंदिरे, गरम पाण्याची कुंडे, पांडवकालीन गुहा, कोकणातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक यांचा विकास व्हावा यासाठी प्रादेशिक पर्यटन मधून मंजूर कामावरील स्थगिती उठवावी.

चिपळूण वाशिष्ठ नदीतील अनेक वर्ष गाळ न काढल्यामुळ्ये चिपळूण शहर महापूर प्रलयाने बाधित झाले त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले. हा गाळ काढण्यासाठी तत्कालीन मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रु. 9 कोटी 56 लाख इतका निधी मंजूर केला होता. तो तीन टप्प्यात देऊन गाळ काढायचे ठरले यातील पहिल्या टप्प्यात गाळ काढण्यासाठी रु. 5 कोटी 17 लाख इतका निधी खर्च झाला असून त्यातील रु. 4 कोटी 39 लाख शिल्लक आहे. सी आर झेड मध्ये येत असलेल्या गाळाचे सर्वेक्षण महाराष्ट्र मेरिटईम बोर्ड की महसूल विभागामार्फत करण्यासंदर्भात शासन स्तरावर निर्णय झाला नाही तो निर्णय तातडीने व्हावा व पूर रेषा विषयी उपाययोजना आणि जास्तीत जास्त निधीची तरतूद व्हावी.

तसेच कोकणातील शेती पंपणा महावितरण कंपनीने AG अदर विभागात केलेले वर्गीकरण ऐवजी शेती असे वर्गीकरण करावे, कात उद्योगासाठी वन खात्याच्या जाचक अटी सुलभ कराव्यात, कोकणातील पूर्ण झालेल्या धरणाच्या कालव्यांसाठी नवीन पाईप लाईन (पी डी एम) धोरण व्हावे ही सर्व निवेदने देऊन यावर मा उपमुख्यमंत्री यासोबत आमदार शेखर निकम यांची सकारात्मक चर्चा झाली.