नव्याने डॉक्टर्स होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ पाराशर आदर्श वस्तुपाठ : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

301

नव्याने डॉक्टर्स होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ पाराशर आदर्श वस्तुपाठ : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

पुणे : ऑस्टियोपॅथी तज्ज्ञ, आयुर्वेद रत्न डॉ. गोवर्धनलाल पाराशर (जोधपूर राजस्थान) यांचे नुकतेच निधन झाले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या वतीने शोकसभेचे आयोजन केले होते. स्ट्रॅटेजिक फोरसाईटचे संचालक सचिन इटकर, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्राचार्य डॉ. सीमी रेठरेकर यांची उपस्थिती होती. डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांच्या प्रतिमेस वंदन करून शोकसभेला सुरवात झाली.

सचिन इटकर म्हणाले, “डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे श्री संवरलाल ऑस्टियोपॅथी चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष होते. जोधपूर, राजस्थान येथील ते एक जादूगार व्यक्तिमत्व होते. इटलीमध्ये त्यांनी ऑस्टियोपॅथीमध्ये पीएचडी केली. सुवर्णपदक विजेता असलेल्या डॉ. पाराशर यांना आयुर्वेद रत्न पदवी बहाल करण्यात आली होती. त्यांनी अनेक लोकांना निरोगी बनविले. पर्यायी वैद्यकीय थेरपी असलेल्या ‘ऑस्टियोपॅथी’ला त्यांनी जगभरात नावलौकिक दिला. प्रख्यात कलाकार, क्रिकेटर्स, राजकीय नेते आदींनी त्यांच्याकडून उपचार करून घेतले. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यामुळे महाराष्ट्राला डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांची ओळख झाली.”

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात सूर्यदत्ताच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला होता . या कार्यक्रमात त्यांना पुण्याला येण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते . त्या नुसार ते दोनच महिन्यात मोफत शिबीराकरिता पुण्यात सूर्यदत्त मध्ये दाखल झाले . चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी रुग्णसेवा केली. आजपर्यंत जगभरात २४०० हून अधिक मोफत शिबिरे घेतली. स्लिप डिस्कने पीडित असंख्य लोकांना त्यांनी पुन्हा चालायला लावले. हाडे, स्नायू आणि मज्जातंतूच्या विकाराच्या असंख्य केसेस कोणत्याही औषधाशिवाय बऱ्या केल्या आहेत. एक कुशल ऑस्टियोपॅथ म्हणून त्यांच्या अनुभवातून आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने प्रभावित क्षेत्राचे अचूक बिंदू ओळखत अनेक रुग्णांवर लीलया उपचार केले आहेत. देशातील आणि परदेशातील राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील प्रतिभावंत आणि प्रसिद्ध व्यक्तीवर उपचार केले आहेत. त्यांचे जाणे आपल्या सर्वांसाठीच न भरून येणारी पोकळी आहे.नवीनच डॉक्टर्स होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते एक आदर्श वस्तुपाठ आहेत ”

BIG NEWS : खंडणीसाठी पुण्यात तिघांचं अपहरण, धागेदोरे नगरमधील सरपंचापर्यंत…

डॉ. सीमी रेठरेकर यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काळात विद्यर्थ्यांना शिबिराच्या निमित्ताने त्यांना भेटण्याची व त्यांच्याकडून ज्ञानार्जन करण्याची संधी मिळाली. अत्यंत सहज सोप्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त असे प्रशिक्षण दिले, अशी आठवण डॉ. रेठरेकर यांनी सांगितली.

सूर्यदत्त धन्वंतरी पुरस्काराने गौरव : ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये मोफत ऑस्टिओपथी शिबिराच्या आठवणी डॉ. चोरडिया यांनी उपस्थितांना सांगितल्या. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि विशेष करून कोविड कालावधीनंतर आरोग्य विषयक जाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने ऑस्टियोपॅथीक तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दिवसाला जवळपास तीनशे हुन अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. स्ट्रेचरवरून आलेले रुग्ण स्वतः चालत गेल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. सूर्यदत्त आणि श्री संवरलाल ऑस्टियोपॅथी चॅरिटेबल संस्था, जोधपूर यांच्यात करार झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या संस्थेतून सूर्यदत्तचे डॉक्टर्स प्रशिक्षण घेऊन आले आहेत. त्यांना सूर्यदत्त धन्वंतरी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते, असेही प्रा. डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.

‘महाराष्ट्र केसरी’सह विजेत्या मल्लांना बक्षिसांचे वितरण