देहात हे शेतकऱ्यांना बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत सर्व सेवा एका छताखाली पुरवणारे प्रभावी माध्यम ! – संजय वाघ

103
Dehat is an effective medium that provides all services to farmers from seed to market under one roof! - Sanjay Wagh

पुणे , ९  मार्च २०२३ : देहात हे शेतकऱ्यांना बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत सर्व सेवा एका छताखाली पुरवणारे प्रभावी माध्यम!  जुन्नर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय वाघ यांचे भव्य शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन. भाजीपाला उत्पादक आणि दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सुविधांची माहिती देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे देहात कंपनीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील ३०० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. यात महिला शेतकऱ्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. यावेळी बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

Dehat is an effective medium that provides all services to farmers from seed to market under one roof! - Sanjay Wagh

याप्रसंगी जुन्नर पंचायत समितीच्या सभापती संगीता वाघजुन्नर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय वाघपंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकरीमल्हार कृषी सेवा केंद्र या देहात केंद्राचे संचालक संदीप वाघदेहातचे सह-संस्थापक आणि संचालक अमरेंद्र सिंगदेहातच्या कृषी निविष्ठा विभागाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ चौधरी तसेच अन्य टीम मेंबर उपस्थित होते.

यावेळी जुन्नर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय वाघ म्हणालेआमच्या भागातील शेतकरी नेहमीच उत्कृष्ट दर्जाचा भाजीपाला व अन्य कृषी मालाचे उत्पादन करतातमात्र आपल्या मालासाठी बाजारपेठ शोधताना त्यांना नेहमीच अडथळ्यांचा सामना करावा लागतो. देहातशी भागीदारी केल्यामुळे आमच्या शेती व्यवसायाला व्यापक बाजारपेठ मिळेलअसा आम्हाला विश्वास वाटतो.” देहातशी जोडले गेलेल्या शेतकऱ्यांपैकी मंगेश हांडे व नितीन वामन यांनी देहात पीक पोषण उत्पादनेपशु खाद्य आणि शेतमाल खरेदी सेवा यांच्यामुळे आपल्याला कसा लाभ झाला याचे अनुभव मांडले.

देहातचे सह-संस्थापक आणि संचालक अमरेंद्र सिंग यांनी देहातच्या आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. ते म्हणालेकी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने देहातची स्थापना झाली. आम्ही ११ वर्षांपूर्वी एका छोट्या गावात सुरूवात केली आणि आता ११ राज्यांमध्ये आमचा विस्तार झाला आहे.

सिद्धार्थ चौधरी यांनी देहात किसान ॲप या देहातच्या कृषी तंत्रज्ञान-आधारित प्लॅटफॉर्मची माहिती दिली. तसेच यातील कृषी सल्लाउत्पादनांची खरेदी व घरपोच सेवामाती परीक्षणहवामान आधारित पीक विमा अशा सुविधांचीही त्यांनी माहिती दिली. ज्याचे शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक सुद्धा करून पाहिले.

देहातचे महाराष्ट्र विस्तार व्यवस्थापक विशाल राजे भोसले म्हणाले कि भाजीपाला पिकेद्राक्षडाळिंब आणि उसासाठी देहातची पीक पोषण उत्पादनेस्टार्टरबूस्टमास्टर आणि न्यूट्रीवन हि शेतकऱ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण पीक व भरघोस नफा देतील.

पशुखाद्य विभागाचे कॅटेगरी मॅनेजर संदीप शेळके यांनी दुभत्या पशूंच्या आहाराचे व्यवस्थापन कसे करायचेयाचे विवेचन करतानाच खुराकदूध प्लस आणि वेटनोकल गोल्ड प्लस या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होतोहे सांगितले.

देहात शेतकऱ्यांकडून फळे आणि भाजीपाला विकत घेऊन त्यांना जास्तीचे उत्पन्न मिळविण्यासाठी कशी मदत करत आहेहे देहातच्या कृषी उत्पन्न खरेदी विभागाचे व्यवस्थापक संदीप वाघ आणि शुभम भोर यांनी समजावून दिले.

देहातचे महाराष्ट्र एक्स्टेंशन मॅनेजर उमेश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.