देशभरात निदान करण्यात दुर्मिळ असलेल्या सीओपीडी च्या आव्हानावर ठरणार स्पायरोमेट्री हा परिणामकारक उपाय

68

पुणे १६ नोव्हेंबर २०२२ : वर्ल्ड सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) डे चे आयोजन दरमहिन्यातील नोव्हेंबर मध्ये करण्यात येते, लोकांमध्ये असलेल्या सर्वात जुन्या फुफ्फुसाच्या आजारपणा विषयीतसेच भारतातील1. एकूण मृत्यूच्या ९.५ टक्के योगदान देणार्‍याया आजारपणा बरोबरच दुसर्‍या क्रमांकाच्या रोगा विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी यादिवसाचे आयोजन करण्यात येते. फुप्फुसाला सूजयेण्यास कारणीभूत असलेल्याया सीओपीडीचे वैशिष्ट्ये म्हणजे या आजाराकडे रुग्ण दुर्लक्ष करुनही स्थिती ओळखत नाहीत आणि त्यामुळेच वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकत नाही. सीओपीडीचे निदान जर लवकर झाले तर त्यामुळे सीओपीडीचा त्रास कमी होऊन त्यामुळे सुधारीत निष्कर्ष प्राप्त होण्यास मदत होते.

साधारणपणे सीओपीडी होण्यामागील कारणे म्हणजे दीर्घकालावधीत विषारी धुलिकण किंवा धुम्रपानाचा धूर, चूलीचा धूर किंवा प्रदुषण करणारे घटक सातत्याने फफ्फुसात जाणे होय. रुग्णाला भेडसावणार्‍या समस्या म्हणजे श्वास कमी पडणे, कफ, कफ निर्माण होणे, खोकला आणि छाती भरुन आल्यासारखी वाटणे. अशा रुग्णांसाठी फुफ्फुसाची तपासणी केली जाते, स्पायरोमेट्री असे या तपासणीचे नाव असून यामुळे सीओपीडीचे निदान करता येते. स्पायरोमेट्री ही गोल्ड स्टॅन्डर्ड निदान तपासणी असून सीओपीडी2 ची तपासणी करतांना तुम्ही किती प्रमाणात श्वास आत घेता आणि किती बाहेर सोडता याची नोंद घेतली जाते, ज्यामुळे व्यक्तीची फुफ्फुसांची तपासणी केली जाते. पण इतके असूनही स्पायरोमेट्रीचा उपयोग खूपच कमी प्रमाणात केला जातो विशेषकरुन प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्ण आजाराच्या2पहिल्या टप्प्यात असतांना या तपासणीचा खूपच कमी वापर केला जातो. साधारण पणे असे दिसून येते की स्पायरोमीटरची कमी असलेली उपलब्धता आणि त्यातील कमी प्रमाणात असलेले नाविन्य यासाठी कारणीभूत आहे.

स्पायरोमेट्री टेस्ट चे महत्त्व अधोरेखित करतांना पुण्यातील प्रतिथयश चेस्ट फिजिशियन आणि इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. महावीर मोदी यांनी सांगितले “ क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) चे वैशिष्ट्य म्हणजे सातत्याने श्वास घेण्यास त्रास होणे आणि फुप्फुसाला हवेचा कमी पुरवठा होणे. सीओपीडी चा वाढता प्रकार पाहता अधिकतर रुग्ण हे सुरुवातीला हा त्रास दुर्लक्षित करतात आणि नंतर त्रास खूप वाढल्यावर उपाय करतात. साधारणपणे दवाखान्यातील रुग्ण, रुग्णाचा इतिहास आणि तपासणी करुन मग सीओपीडीचे निदान केले जाते, जेणेकरुन कित्येकदा आजाराचा पहिला टप्पा हा दुर्लक्षित होतो. स्पायरोमीटर टेस्ट सारख्या टेस्ट केल्यास पहिल्या टप्प्यातच रुग्णाचे निदान होऊन लवकर उपचार करणे शक्य होते.”

यावर आपले विचार व्यक्त करतांना पुण्यातील ब्राँकोस्कोपिस्ट आणि ॲलर्जी स्पेशॅलिस्ट तसेच चेस्ट फिजिशियन डॉ. महेंद्र कवेडिया यांनी सांगितले “ लवकरात लवकर फुफ्फुसाच्या कार्याची तपासणी विशेष करुन स्पायरोमेट्री टेस्ट केल्यामुळे सीओपीडी चे निदान लवकर होऊन आजाराचे व्यवस्थापन करता येते जेणेकरुन आजार खूपच बळावण्याची शक्यता कमी होते. या भागात खूपच लोकसंख्या असल्याने सीओपीडी सारखे आजार खूप मोठ्या प्रमाणावर असतात त्याच बरोबर सातत्याने श्वासाचे आजार होत असतात. ज्यासाठी स्पायरोमेट्री सारख्या चाचण्या खूपच उपयुक्त ठरतात. जरी श्वासामुळे होणारे आजार पूर्ण बरे करणे कोणाच्या नियंत्रणात नसले तरीही जागरुक राहून वेळेत निदान करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.”

जरी नाविन्य निर्माण करुन उपकरणे अधिक अचूक करून स्पायरोमीटर्स सहज उपलब्ध होत असली तरीसुध्दा हे उपकरण अधिक वायरलेस आणि वाहून नेण्यास सोपे करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.

या स्पायरोमीटरची उपलब्धता आणि नाविन्या विषयी बोलतांना सिप्ला लिमिटेड चे ग्लोबल चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. जयदीप गोगट्ये यांनी सांगितले “ स्पायरोमीटर या उपकरणामुळे सीओपीडीचे लवकर आणि अचूक निदान करणे शक्य होते. स्पायरोमीटर्स च्या उपलब्धतेतील दरी कमी करण्याच्या उद्देशाने सिप्ला ने स्पायरोफाय या भारतातील पहिल्या न्युमोटेक वर आधारीत पोर्टेबल, वायरलेस स्पायरोमीटरची सुरुवात केली असून त्यामुळे देशातील स्पायरोमेट्री ची अचूकता वाढू लागली आहे. स्पायरोफाय ची तपासणी ही भारतीय रुग्णांवर करण्यात आली असून यातून असे आढळून आले आहे की हे गोल्ड स्टॅन्डर्ड स्पायरोमीटर प्रमाणेच सीओपीडीचे अचूक निदान करुन ९७ टक्के संवेदनशीलता3 साध्य करते.”