दुर्मिळ रक्तविकार असलेल्या महिलेची प्रेग्नन्सी मॉमस्टोरीमध्ये सुरळीतपणे पार पाडली गेली

पुणे, मार्च २०२४: मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटल, आशा आणि वैद्यकीय कौशल्यांचा आधारस्तंभ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुण्यातील इंदापूरच्या रहिवाशी, ३७ वर्षे वयाच्या श्रीमती संगीता (नाव बदलण्यात आले आहे) यांना फॅक्टर XIII कमतरता हा दुर्मिळ रक्तविकार असून देखील त्यांचे बाळंतपण मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पाडण्यात आले आहे.

संगीता यांना फॅक्टर XIII कमतरता हा मासिक पाळीदरम्यानच्या रक्तस्रावाशी संबंधित अतिशय दुर्मिळ विकार असल्याने खूप जास्त आणि प्रदीर्घकाळ रक्तस्त्राव होत होता, त्यामुळे त्यांचे वारंवार गर्भपात होत होते, आणि ही त्यांची गरोदर राहण्याची पाचवी वेळ होती. अँटीफॉस्फोलिपिड सिंड्रोमचे मूल्यांकन करण्यासाठी आणि गरोदरकाळात अँटीकोआग्युलेशन गरजेचे आहे का हे ठरवण्यासाठी त्यांना सह्याद्रि हॉस्पिटल्समधील हेमॅटोलॉजिस्टकडे पाठवण्यात आले होते. एपीएलए(APLA) सिंड्रोमच्या आधीच्या तपासण्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता, स्पेशलाइज्ड फॅक्टर XIII युरिया क्लॉट सोल्युबिलिटी टेस्टमार्फत पुढील तपासणी केल्यावर समजले की त्यांना फॅक्टर XIII कमतरता असल्याचे लक्षात आले. ब्लीडिंग विकार असलेल्या रुग्णांमध्ये वंध्यत्वाची समस्या असते पण या केसमध्ये सह्याद्रि हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनी सर्व गोष्टी नीट हाताळल्या.

त्यांची स्थिती असामान्य असल्याचे ध्यानात घेऊन हडपसर येथील सह्याद्रि हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एक विशेष उपचार योजना तयार केली. प्रेग्नन्सीच्या संपूर्ण कालावधीत संगीता यांना नियमितपणे क्रायोप्रेसिपिटेट हे फॅक्टर XIII असलेले ब्लड कम्पोनंट देण्यात आले. या क्रांतिकारी दृष्टिकोनामुळे प्रेग्नन्सी यशस्वीपणे पूर्ण झाली आणि १० ऑक्टोबर २०२३ रोजी सिझेरियन सेक्शनद्वारे त्यांनी एका निरोगी बाळाला जन्म दिला.

पुण्यातील हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सचे हेमॅटोलॉजिस्ट डॉ चंद्रकांत लहाने म्हणाले, “फॅक्टर XIII कमतरता हा ब्लीडिंगशी संबंधित एक दुर्मिळ विकार आहे. ५ मिलियन व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा विकार होतो. नेहमीच्या कोआग्युलेशन टेस्ट्समधून याचे निदान केले जाऊ शकत नाही. दुर्मिळ रक्तविकारांचे अचूक निदान करण्यासाठी, खासकरून प्रजननसंस्थेच्या आरोग्याशी निगडित रक्तविकार असल्यास, सखोल तपासणी आणि विशेष तपासण्या करणे आवश्यक असते. ही केस हाताळत असलेल्या आधीच्या डॉक्टरांना थ्रोम्बोसिस विकार असल्याचा संशय होता पण सह्याद्रि हॉस्पिटल्समधील आमच्या टीमने हा रक्तस्रावाशी संबंधित विकार असल्याचे बरोबर ओळखले. फॅक्टर XIII कमतरतेमुळे गरोदरपणाच्या काळात काही विशेष आव्हानांना सामोरे जावे लागते. सह्याद्रि हॉस्पिटल्सने या केसमध्ये मिळवलेले यश आमच्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याप्रती आणि प्रजननसंस्थेच्या आरोग्याच्या आड येणाऱ्या समस्या दूर करण्याप्रती आमची बांधिलकी दर्शवते.”

 हडपसर येथील मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटलच्या ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनॅकॉलॉजिस्ट डॉ अर्चना बेलवी यांनी संगीताची प्रसुतीपूर्व काळजी घेण्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावली. त्या म्हणाल्या, “गरोदर असताना श्रीमती संगीता आमच्याकडे आल्या. फॅक्टर XIII कमतरतेचे निदान करण्यात आलेले असल्याने आमच्या टीमने डॉ लहाने यांच्या सहयोगाने निपुण वैद्यकीय व्यवस्थापन केले. मॉमस्टोरीमध्ये आम्ही वैद्यकीय पैलूंबरोबरीनेच अशा केसमधील मानसिक पैलू देखील विचारात घेतो आणि रुग्णांना एकाच ठिकाणी सर्वसमावेशक देखभाल सेवा पुरवतो. गरोदरकाळातील प्रत्येक टप्प्यावर गर्भवती महिला आणि गर्भ या दोघांवर बारकाईने लक्ष ठेवून आम्ही या महिलेची प्रेग्नन्सी यशस्वीपणे पूर्ण होईल याची काळजी घेतली. प्रसूतीच्या वेळी सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतली होती आणि प्रसूतीनंतर रक्तस्त्राव टाळण्यासाठी निवारक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.”

 डॉ अर्चना बेलवी यांनी टीमच्या समन्वयपूर्वक प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले, “मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये या केसच्या व्यवस्थापनामध्ये मिळालेले यश ऑब्स्टेट्रिक्स टीमने हेमॅटोलॉजी टीम आणि मॉमस्टोरी मॅनेजमेंट यांनी एकत्र मिळून केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे.”

 श्रीमती संगीता यांच्या केसने सह्याद्रि हॉस्पिटलचा भक्कम पाठिंबा आणि नाविन्यपूर्ण उपचार यावर प्रकाश टाकला असून, गर्भावस्थेमध्ये दुर्मिळ रक्तविकारांच्या व्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. प्रसूतीनंतर संगीता आणि त्यांचे बाळ या दोघांचीही तब्येत उत्तम असून रक्तस्रावासंदर्भात कोणतीही गुंतागुंत निर्माण न होता, प्रसूतीनंतर चार दिवसांनी त्यांना घरी पाठवण्यात आले. या केसमध्ये मिळालेल्या यशाने दुर्मिळ वैद्यकीय स्थितींचे व्यवस्थापन करण्याबाबतच्या समन्वयपूर्वक आणि विशेष दृष्टिकोनाचा प्रभाव आणि आपल्या रुग्णांना अतुलनीय देखभाल पुरवण्याप्रती सह्याद्रि हॉस्पिटल्सची बांधिलकी देखील दर्शवली आहे.