दिग्विजय सिंहाविरोधात साध्वी प्रज्ञा रिंगणात

262

भोपाळ : मध्यप्रदेशच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. साध्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. या जागेसाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहन यांना तिकीट देण्याची चर्चा होती. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साध्वी प्रज्ञाचे नाव पुढे केल्याचे मानले जात आहे. साध्वी प्रज्ञा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून एनआयएच्या चौकशीतून गेल्या आहेत.

भाजपाने बुधवारी साध्वी प्रज्ञासमवेत चार उमेदवारांची यादी जारी केली. इंदूर लोकसभेसाठी मात्र अद्यापही उमेदवाराची निवड करण्यात आली नाही. यापूर्वी इंदूर मतदारसंघातून सुमित्रा महाजन या 8 वेळेस खासदार राहिलेल्या आहेत. पण यावेळी त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

माझ्यासाठी हे धर्मयुद्ध आहे : साध्वी प्रज्ञा

तिकिट निश्चित करण्यापूर्वी साध्वी प्रज्ञाने माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपाचे संगठन महामंत्री रामलाल यांसह अन्य नेत्यांची भेट घेतली होती. भाजपा प्रदेश कार्यालयातून निघाल्यानंतर त्या म्हणाल्या की, माझ्यासाठी हे आव्हान नाही तर एक धर्मयुद्ध आहे आणि ते आम्हीच जिंकणार. मी पार्टीच्या अनेक नेत्यांची भेट घेतली. राष्ट्राविरोधात षड्यंत्र करणाऱ्यां विरुद्ध लढण्याचा सर्वांनी निश्चय केला आहे. कारण आमच्यासाठी राष्ट्र सुरक्षा पहिले आहे आणि इतर गोष्टी नंतर असल्याचे त्या म्हणाल्या.