पुणे; सप्टेंबर 2023: -आदित्य बिर्ला फॅशनद्वारे तस्वा, पुरुषांच्या कपड्यांचा भारतीय ब्रँड तसेच सुप्रसिद्ध डिझायनर तरूण तहिलीयानी यांना पुणे येथे त्यांच्या दुसऱ्या दालनाच्या उद्घाटनाची घोषणा करताना आनंद वाटतो आहे. या उद्घाटनाच्या सोबतीने तस्वाने देशातील 56 व्या दालनाचा टप्पा ओलांडला.
पुरुषांच्या कपड्यांचा भारतीय ब्रँड आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल व सुप्रसिद्ध डिझायनर तरूण तहिलीयानी यांच्या वतीने पुणे येथील एमजी रोडवरील दुसऱ्या मुख्य दालनाचा शुभारंभ
हे नवीन दालन विक्री रणनीतिच्या दृष्टीने मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या एमजी रोडवर वसलेले असून पुण्यातील हा भाग गर्दीचा आणि भरगच्च खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी शहरातील चोखंदळ ग्राहक वर्गासाठी अत्यंत बारकाईने, नवीन दृष्टिकोन लक्षात घेत, आराम आणि स्टाईलच्या संगमाने तयार करण्यात आलेले विवाह तसेच अन्य खास प्रसंगांसाठीचे पेहराव उपलब्ध असणार आहेत.
पुणे येथील तस्वा’चे दुसरे दालन त्यांच्या हटके फॅशन आणि लाईफस्टाईल उत्पादनांप्रती वचनबद्धता जपत आणि विकासावर भर देत ब्रँडच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्प ठरला आहे. या ब्रँडचे नवीन दालन सुमारे 3,188 चौ. फू. जागेवर विस्तारलेले असून याठिकाणी कुर्ते, बंडी, शेरवानी, बंदगळा, अचकन, चुडीदार, अलीगडी त्याचप्रमाणे साफा, ब्रोचेस, पॉकेट स्केअर्स, शाली, स्टोल, मोजरी इत्यादी लक्षणीय उत्पादन श्रेणी उपलब्ध आहे. या दालनाचं अभिरुची संपन्न वातावरण अद्वितीय संग्रहाला साजेसे आहे. तस्वाच्या टीमला स्टाईलची असलेली जाण त्यांना ग्राहकांच्या अभिनव पसंतीचे आकलन असल्याची पावती देतात. ही टीम ग्राहकाला त्याच्या पसंतीनुसार वैयक्तिक साह्य उपलब्ध करून देते.
प्रत्येक कपड्यात तरूण तहिलीयानी यांची सिग्नेचर स्टाईल झळकते; तस्वा पेहराव शोभून दिसावा म्हणून तज्ज्ञ नजरेतून बारकाईने केलेल्या कामाचे दर्शन घडते. तस्वासाठी भारतीय कापडोद्योगाचा समृद्ध वारसा जपणारे सिल्क, बनारसी ब्रोकेड, वेल्वेट आणि कॉटन कापड वापरले जाते. जरदोसी, आरी, चिकनकारी आणि गोटा काम असलेली पारंपरिक कशिदाकारी या कलेक्शनमध्ये भरपूर वापरण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतीय कारागिरीसह समकालीन शिलाई पद्धती ग्लोबल इंडियनकरिता वापरली आहे.
नवीन स्टोअरच्या अनावरणावर आपले विचार मांडताना, तस्वाचे चीफ डिझाईन ऑफिसर तरूण तहिलीयानी म्हणाले, “तस्वा हे माझे दीर्घकाळापासूनचे स्वप्न आहे, जे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल द्वारे शक्य झाले आहे. हे नाव स्वतःच्याच उत्कृष्ट आवृत्तीचे प्रतिनिधित्व करते, आम्ही ब्रँडद्वारे आवृत्ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. बऱ्याच काळापासून, मी ऐकले आहे की पारंपरिक पोशाख वापरण्याचा विचार हल्लीच्या पिढीला अस्वस्थ करतो, आणि हा विचार गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न तस्वा करत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना, भारतीय माणसाकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर अप्रतिम पद्धतीने डिझाइन केलेले कपडे घेऊन आलो आहोत.”
लॉन्चविषयी भाष्य करताना, तस्वाचे ब्रँड हेड आशिष मुकुल म्हणाले, “गेल्या वर्षभरात तस्वाने आपल्या सर्वोत्तम श्रेणीतील उत्पादनांच्या ऑफरसह आणि पुरुषांच्या भारतीय पोशाख खरेदीदारांसाठी अभिनव दालन अनुभवासह ठोस ग्राहक वर्ग निर्माण केला आहे. सर्व प्रकारचे भारतीय सणा-समारंभ आणि पुरूषांसाठी विवाह पेहराव आणि अॅक्सेसरीजसह संपूर्ण उत्पादन श्रेणी उपलब्ध करून, आम्हाला विश्वास वाटतो की पुण्यासारखी मजबूत बाजारपेठ आमच्यादृष्टीने हा ब्रँड आणखी अनेक ग्राहकांपर्यंत नेण्याची प्रचंड क्षमता देते. आमच्या सध्याच्या 34 शहरांतील 56 दालनांच्या संपर्कजाळ्यामधून, आमच्या दालन विस्ताराला यंदा आर्थिक वर्षाच्या अखेरीस 90 हून अधिक दालनांच्या नेटवर्कसह गती देण्याची योजना आखत आहोत.”
दालन पत्ता: – तस्वा, वसूपूज्य स्वामी महाराज देवालयानजीक, 658 सच्चापीर मार्ग, एमजी रोड, कॅम्प रोड, पुणे– 411001
वेळ : सकाळी 11:00 – रात्री 9:00 नियमित | दूरध्वनी: 020-29972107
www.tasva.com वर देखील उपलब्ध