पुणे : तनिष्कने सादर केले ‘सेलेस्ट X सचिन तेंडुलकर’ सॉलिटेयर कलेक्शन. प्रतिभा व दुर्लभतेचा अनोखा मिलाप, अनेक चमकदार नॅनो-फॅसेट्ससह बनवण्यात आलेले कलेक्शन, जे आहे ‘ब्रिलियंट बाय डिझाईन’ भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य, तनिष्कने सादर केले आहे शानदार सॉलिटेयर कलेक्शन ‘ सेलेस्ट X सचिन तेंडुलकर’. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या पन्नासाव्या जन्मवर्षात त्यांच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा सोहळा साजरा करत, त्यांच्या उल्लेखनीय यशाचा सन्मान करत तनिष्कने हे कलेक्शन अतिशय विचारपूर्वक, प्रत्येक बारकाव्यावर नीट लक्ष देऊन आणि परफेक्शन साधून तयार केले आहे.
१०० लिमिटेड एडिशन सॉलिटेयर कलेक्शन खुद्द सचिन तेंडुलकर यांच्यासारखेच आहे, म्हणूनच हे कलेक्शन सचिन तेंडुलकर यांचे गुण व यश यांचे प्रतिनिधित्व करते. या कलेक्शनमधील प्रत्येक दागिन्यामध्ये हाताने घडवण्यात आलेल्या हिऱ्यांची अतुलनीय चमक व अनेकविविध रंगांची शान पाहताक्षणी मन मोहवून टाकते. हिऱ्यांच्या विश्वात सेलेस्ट सॉलिटेयर सर्व दागिन्यांचा शिरोमणी आहे. या उबर-प्रीमियम कलेक्शनच्या दागिन्यांना क्रांतिकारी डायमंड कटिंग तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले आहे, हे तंत्रज्ञान कमीत कमी सहा पेटंटने संरक्षित करण्यात आले आहे, डायमंड कटिंगच्या क्षेत्रात एका अभूतपूर्व नाविन्याचे फलित आहे सेलेस्ट सॉलिटेयर.
‘तनिष्क सेलेस्ट X सचिन तेंडुलकर’ मध्ये अंगठ्या, कानातली आणि बांगड्यांसह महिला व पुरुष दोघांसाठी तयार करण्यात आलेली अनेक शानदार डिझाइन्स आहेत. तनिष्क सेलेस्टमधील प्रत्येक दागिना हाताने घडवण्यात आला आहे आणि सचिन तेंडुलकर यांची शैली व व्यक्तित्वाप्रमाणेच सर्वोत्कृष्ट अशी ही डिझाइन्स आहेत. तनिष्कच्या या आकर्षक कलेक्शनमध्ये उच्चतम क्लॅरिटी ग्रेडचा उपयोग करण्यात आला आहे, ज्यामध्ये १०X मॅग्निफिकेशनखाली पाहिले तरी एकही दोष दिसून येत नाही. हे शानदार सॉलिटेयर पीस उत्कृष्टता, प्रतिभा, दुर्लभता, प्रेम आणि आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षणांच्या आनंदाचे प्रतीक आहेत. सॉलिटेयर्सचे विशेष कलेक्शन उत्कृष्ट अभिरुची, कालातीत डिझाइन्स यांचे अतुलनीय रूप आहे.
या शानदार कलेक्शनच्या लॉन्च प्रसंगी तनिष्क, टायटन कंपनी लिमिटेडचे व्हीपी – कॅटेगरी, मार्केटिंग आणि रिटेल श्री अरुण नारायण यांनी सांगितले, “तनिष्क सेलेस्टचा शुभारंभ आमच्यासाठी एक संस्मरणीय क्षण आहे. अतुलनीय प्रतिभा, चमक आणि शान यांच्यासह सर्वाधिक कौशल्याने तयार करण्यात आलेले हे सॉलिटेयर डायमंड्स प्रस्तुत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट ठिकाणांहून सोर्स करण्यात आलेले, उत्कृष्टतेच्या ६०हुन जास्त निकषांवर ग्रेड करण्यात आलेले हे हिरे म्हणजे एक शतकाहून जास्त काळानंतर डायमंड कटिंगमध्ये घडून आलेले सर्वात मोठे नावीन्य आहे. हजारो अदृश्य नॅनो प्रिजम्स हे प्रत्येक तनिष्क सेलेस्ट डायमंडचे वैशिष्ट्य आहे, जे लाईट परफॉर्मन्सला वाढवतात आणि अतुलनीय प्रतिभा सुनिश्चित करतात व तनिष्क सेलेस्टला खऱ्या अर्थाने “ए कट अबोव्ह” बनवतात.
सेलेस्टची बहूमुल्यता वृद्धिंगत करण्यासाठी उत्कृष्टता, प्रतिभा, जराही कमतरता नसलेली शैली आणि सुबकता यांचे प्रतीक मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांच्यासोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. त्यांची उत्कृष्टता आणि प्रतिभा यांचा सन्मान करताना, १०० लिमिटेड एडिशन ‘सचिन X सेलेस्ट सॉलिटेयर’ प्रस्तुत करताना आम्ही खूप खुश आहोत. हे सॉलिटेयर डी-फ्लॉलेस १ कॅरेट श्रेणीमध्ये जगभरात उपलब्ध ०.००६% सॉलिटेयर अंतर्गत येतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्टता आणि प्रतिभा यांचे अत्युच्च मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या १०० शतकांचा सन्मान करणारे “या घडीचे १ कॅरेटचे जगातील सर्वात किमती हिरे” आहेत. याशिवाय स्वतः मास्टर ब्लास्टर यांच्या प्रमाणेच सेलेस्ट हिऱ्यांची सुरुवात देखील वैशिष्ट्यपूर्ण झाली पण त्यांना तयार करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये पूर्णत्व आणण्यासाठी डिझाईन आवश्यक होते. ही वाटचाल कायमस्वरूपी स्मरणात राहावी यासाठी प्रत्येक स्पेशल एडिशन सचिन X सेलेस्ट सॉलिटेयरसोबत एक विशेष कॉफी टेबल बुक – “सचिन, ब्रिलियंट बाय डिझाईन!” देखील दिले जात आहे.”
या भागीदारीबद्दल श्री सचिन तेंडुलकर यांनी सांगितले, “हे एक्सक्लुसिव्ह लिमिटेड एडिशन कलेक्शन तयार करण्यासाठी तनिष्कसोबत भागीदारी करताना मला खूप आनंद होत आहे. एक आदरणीय ब्रँड तनिष्क डिझाइन्स, विश्वास आणि ग्राहकांसोबत घनिष्ठ संबंध यांच्यासाठी ओळखला जातो. तनिष्क सेलेस्ट हे नाविन्यपूर्ण कलेक्शन खूपच विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे, सर्वांना एकत्र आणण्याच्या क्रिकेटच्या वैशिष्ट्याचा यामध्ये सन्मान करण्यात आला आहे. मला खात्री आहे की ही भागीदारी ग्राहकांसाठी उत्कृष्टतेचा सन्मान करण्याचे नवे मार्ग खुले करेल.”
हेही वाचा :