तनिष्कच्या ‘स्टनिंग एव्हरी इअर’ कलेक्शनसह साजरी करा अक्षय तृतीया

71
तनिष्कच्या 'स्टनिंग एव्हरी इअर' कलेक्शनसह साजरी करा अक्षय तृतीया

पुणे : तनिष्कच्या ‘स्टनिंग एव्हरी इअर’ कलेक्शनसह साजरी करा अक्षय तृतीया जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये सोन्याला असाधारण महत्त्व आहे. सोने म्हणजे पावित्र्यराजसी शान आणि शुद्धता यांचे प्रतीकसोने म्हणजे समृद्धी आणि भरभराट मानले जाते. अक्षय तृतीयेच्या पवित्र सणाच्या निमित्ताने भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य तनिष्कने सादर केले आहे सोने आणि हिऱ्यांनी बनवलेल्याआधुनिकअनोख्या इयररिंग्सचे शानदार कलेक्शन – स्टनिंग एव्हरी इअर‘.

प्रत्येक महिलेच्या स्टाईलला साजेशी इयररिंग्सची डिझाइन्स तनिष्कमध्ये उपलब्ध असून, ‘स्टनिंग एव्हरी इअर’ हे अजून एक नवे कलेक्शन सादर करून ब्रँडने त्यामध्ये वैविध्यतेची मौल्यवान भर टाकली आहे. कानातल्याच्या प्रत्येक जोडीमागे एक खास कहाणी आहे, प्रत्येक कानातल्याचे स्वतःचे व्यक्तित्व आहे आणि म्हणूनच ती सर्वांसाठी ‘परफेक्ट मॅच’ ठरतात. नवीन कलेक्शनमध्ये अतिशय सुंदर, कलात्मकरीत्या घडवण्यात आलेल्या इयररिंग्सची विशाल श्रेणी आहे, प्रत्येक महिलेची अभिरुची, शैली, पेहराव आणि प्रत्येक प्रसंगाला साजेशी कानातली मिळावीत या उद्देशाने ही श्रेणी तयार करण्यात आली आहे. सुबक स्टड्स, आधुनिक ड्रॉप इयररिंग्स, क्लासी क्लाइम्बर्स, पारंपरिक झुमके आणि इतर अनेक पद्धतीच्या कानातल्यांचा यामध्ये समावेश आहे. या कलेक्शनमधील प्रत्येक दागिना अतिशय अचूकपणे, प्रत्येक बारकाव्याकडे नीट लक्ष देऊन तयार करण्यात आला आहे. १८ व २२ कॅरेटमध्ये घडवलेली शानदार, कलात्मक डिझाइन्स यामध्ये आहेत.

यंदाच्या अक्षय तृतीयेनिमित्त तनिष्कने मनमोहक, शानदार कानातल्यांबरोबरीनेच आकर्षक ऑफर्स देखील सादर केल्या आहेत त्यामुळे हा सण तनिष्कच्या ग्राहकांसाठी समृद्धी व आनंदाची बहार घेऊन येणार हे नक्की. १४ ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मूल्यावर २०% ची आकर्षक सूट* तनिष्कने जाहीर केली आहे.

यंदाच्या अक्षय तृतीयेला तनिष्कच्या ‘स्टनिंग एव्हरी इअर’ या शानदार नव्या कलेक्शनसह घरी घेऊन या सुख, समृद्धी आणि भरपूर आनंद. तनिष्कने एक आकर्षक ऑफर सुरु केली आहे, जिचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये वर्षानुवर्षे पडून असलेले जुने सोने एक्स्चेंज करून तनिष्कची शानदार, मोहक डिझाइन्स कोणताही अतिरिक्त खर्च न करता विकत घेऊ शकाल.  कोणत्याही दुसऱ्या सोनाराकडून विकत घेतलेले जुने सोने एक्स्चेंज करून १००%* एक्स्चेंज मूल्य मिळवा.

तनिष्कच्या 'स्टनिंग एव्हरी इअर' कलेक्शनसह साजरी करा अक्षय तृतीया

टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ श्री. अजॉय चावला यांनी सांगितले“अक्षय तृतीयेसाठी खरेदी करण्याचा अमाप उत्साह ग्राहकवर्गात दिसून येत आहे आणि आशा आहे की ऑफर सुरु झाल्यापासून शेवटच्या ४-५ दिवसांत त्यामध्ये अजून जास्त भर पडेल. सोन्याच्या दरांमध्ये होत असलेले चढउतार ध्यानात घेऊन तनिष्कने आपल्या ग्राहकांना निश्चिन्तपणे खरेदी करण्याची संधी देण्यासाठी या महिन्यासाठी गोल्ड रेट प्रोटेक्शन प्लॅन देखील सुरु केला आहे, यामध्ये तुम्ही आगाऊ बुकिंग करून सध्याच्या अस्थिरतेच्या काळात देखील स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल. सोन्याच्या किमतींमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन आम्ही ओल्ड गोल्ड एक्स्चेंज ऑफर आणली आहे, कमी वजनाच्या दागिन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे, अशाप्रकारे आमचा ब्रँड ग्राहकांना मर्यादित बजेटच्या समस्येचा सामना करण्यासाठी मदत करत आहे, जेणेकरून ते पवित्र सणासाठी मौल्यवान दागिने खरेदी करू शकतील. इयररिंग्सचे शानदार कलेक्शन – स्टनिंग एव्हरी इयर प्रस्तुत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, यामध्ये २२ कॅरेट सोन्यापासून बनलेले आणि डायमंड स्टडेड इयररिंग्स देखील आहेत. आम्हाला पक्की खात्री आहे की, यंदा अक्षय तृतीयेच्या काळात रिटेल विक्रीत अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळेल.”

तनिष्कमध्ये दागिन्यांची विशाल श्रेणी उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या आवडीनिवडीला पुरेपूर वाव मिळतो, याठिकाणी प्रत्येक ग्राहक आपल्या आवडीचे, आपली गरज पूर्ण करतील असे, आपल्या शैलीला, पेहरावाला साजेसे कानातले निवडू शकतात. तनिष्कचे कानातले घालून तुम्ही प्रत्येक प्रसंग खास बनवू शकाल. जवळच्या तनिष्क स्टोरला भेट द्या आणि गोल्ड रेट प्रोटेक्शनचे लाभ मिळवा – दागिन्यांचे आगाऊ बुकिंग करून ग्राहकांना गोल्ड रेट प्रोटेक्शन* मिळवता येईल आणि वाढणाऱ्या सोन्याच्या दरांपासून ३० एप्रिल २०२३ पर्यंत सुरक्षित राहता येईल. ‘स्टनिंग एव्हरी इअर’ हे कलेक्शन निवडक तनिष्क स्टोर्स आणि तनिष्कची ई-कॉमर्स वेबसाईट https://www.tanishq.co.in/stunningeveryear वर उपलब्ध आहे.