‘तणावमुक्ती साठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान

102
Top

पुणे येथील ‘जाधवर इन्स्टिट्यूट’च्या ज्युनियर कॉलेज आणि प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय येथे ‘तणावमुक्ती साठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान!

पुणे – येथील ‘प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय’ येथील शिक्षकांसाठी १५ नोव्हेंबर या दिवशी आणि २२ नोव्हेंबर या दिवशी ‘जाधवर इन्स्टिट्यूट’च्या ‘ज्युनियर कॉलेज’ मधील इयत्ता ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्ती साठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.यावेळी शिक्षकांच्या व्याख्यानाला 20 शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या व्याख्यानाला 87 विद्यार्थी उपस्थित होते.
 कु क्रांती पेटकर यांनी या व्याख्यानात मुख्यतः तणाव येण्याची कारणे, त्याचे परिणाम, निरोगी आरोग्य कसे लाभू शकते, मनुष्य जन्माचे ध्येय काय? जीवनात आनंदी रहाण्यासाठी साधना करण्याचे महत्त्व, साधना कशी करावी?” इत्यादी विषयी सविस्तर माहिती सांगितली.त्यावेळी उपस्थितांनी आम्हाला खूपच उपयुक्त माहिती मिळाल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे काही जणांनी नियमितपणे ऑन लाईन सत्संगाला जोडणार असल्याचे मत व्यक्त केले.सौ.मीना गोले आणि अन्य कार्यकर्त्यांनी यासाठी सहकार्य केले.
जाधवर कॉलेजमध्ये सनातन संस्थेच्या वतीने सर्वांनाच उपयुक्त ठरणार असे व्याख्यान नियमितपणे घेत असल्याबद्दल कॉलेज च्या वतीने वक्त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.