तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळाल्याने पुणे बनले आयडी फ्रेशची सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ

47

पुणे : तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळाल्याने पुणे बनले आयडी फ्रेशची सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आयडी फ्रेश या भारताच्या सर्वात मोठ्या ताज्या खाद्यपदार्थांच्या ब्रँडसाठी पुण्याने सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून समोर येत इतर महानगरांना मागे टाकले आहे. हा ब्रँड त्याच्या पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थांसाठी लोकप्रिय आहे. चोखंदळपणा, खास अशी खाद्य संस्कृती आणि निर्णायक ग्राहक व्यवहार यासाठी ख्याती असलेल्या पुणेकरांनी व्यापक प्रमाणात आयडी फ्रेशच्या उत्पादनांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.

बंगळुरु, चेन्नई, हैद्राबाद आणि मुंबई तसेच अन्य महत्त्वाच्या बाजारपेठांच्या तुलनेत पुण्यात गेल्या काही महिन्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची नोंद होत आहे.या ब्रँडने गेल्या आर्थिक वर्षात २७ कोटी रुपयांचा पल्ला गाठला असून ही जनमानसातील त्याच्या लोकप्रियतेची पावतीच आहे.

आयडीच्या इडली-डोसा पीठ आणि फिल्टर कॉफी डिकोशन या प्रमुख उत्पादनांच्या बळावर ही वाढ झाली असून ही उत्पादने पुण्यात अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत. सध्याची मागणी पाहता कंपनीला या दोन्ही उत्पादनांच्या माध्यमातून येत्या काही वर्षांत ५० कोटी रुपयांचा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. हा ब्रँड आपल्या आरोग्यदायी, सर्वोत्तम दर्जाच्या आणि चविष्ट उत्पादनांसाठी लोकप्रिय आहे, तसेच पश्चिम भारतातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये आयडीच्या सर्वाधिक वाढीमध्ये तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

योग्य प्रमाणात उत्पादन आणि वितरण करणे, हे सुनिश्चित करण्यासाठी भविष्यवेधी उपायांचा अवलंब करणे जेणेकरून कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाहीहे या वाढीचे कारण आहे. भविष्यवेधी विश्लेषणाच्या आधारे ‘डिमांड सेन्सिंग’ सोल्यूशनचीसुद्धा कंपनीला तिच्या उत्पादनांसाठी मासिक आणि साप्ताहिक मागणीचा अचूक अंदाज करण्यास मदत होते.त्यामुळे ग्राहकांना अनेक प्रकारे चांगली सेवा देण्यात मदत होते.

सध्या आयडीची उत्पादने सर्व प्रमुख ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह जवळपास १५०० आउटलेटमध्ये उपलब्ध आहेत. स्वतःची पुरवठा साखळी असल्यामुळे कंपनी बाजारपेठेत जलद गतीने पोचण्याबरोबरच कठोर गुणवत्ता नियंत्रणाचीही खात्री करते.

या महत्त्वाच्या टप्प्याबाबत भाष्य करताना आयडी फ्रेशचे सीईओ आणि सह-संस्थापक श्री. पी.सी. मुस्तफा म्हणाले“ पुणेकरांनी आमची उत्पादने आणि ब्रँडवर विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. एक कंपनी म्हणून, आपल्या ग्राहकांना दर्जेदार, निरोगी आणि चवदार उत्पादने पुरवण्याचा आणि त्यांना अधिक परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने जोडून आमच्या ग्राहकांना आनंद देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

सध्या कंपनी भारत, यूएई आणि अमेरिकेतील ४५ हून अधिक ठिकाणी ३५,००० रिटेल स्टोअर्समध्ये सेवा पुरवते. बेंगळुरूतील या ब्रँडच्या विस्तृत नैसर्गिक आणि आरोग्यदायी उत्पादनांच्या श्रेणीमध्ये इडली आणि डोसा पीठ, तांदूळ रवा इडली पीठ, मलबार परोटा, गव्हाचा परोटा, सँडविच व्हाईट ब्रेड आणि गव्हाचा ब्रेड, घरगुती गव्हाचा पराठा, गव्हाची चपाती, मऊ आणि मलाईदार पनीर, मलईदार घट्ट दही, ‘स्क्विज अँड फ्राय’ वडा पीठ, इन्स्टंट फिल्टर कॉफी लिक्विड आणि इन्स्टंट कॉफी पावडर यांचे कस्टमाईज्ड मिश्रण यांचा समावेश आहे.