पुणे, ०७ जून २०२३ : ड्रूम स्टडीत ‘एमजी झेडएस ईव्ही’चे पुनर्विक्री किंमतीत वर्चस्व – वाहन उद्योग अधिक शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल दळणवळण पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने (EVs) लक्षणीय बदल अनुभवत आहे. या उदयोन्मुख बाजारपेठेतील आघाडीच्या नामांकितांपैकी टाटा मोटर्स आणि एमजी मोटर इंडिया हे दोन्ही प्रभावी इलेक्ट्रिक एसयूव्ही उपलब्ध करून देतात.
एमजी मोटर इंडियाचे प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन झेडएस ईव्ही आपली प्रभावी वैशिष्ट्यं आणि क्षमतांमुळे चारचाकी इच्छुकांत सर्वाधिक मागणी असलेले वाहन बनले आहे. उच्च कामगिरी, कार्यक्षमता आणि शाश्वतता प्रदान करू शकणार्या इलेक्ट्रिक वाहन शोधात चालकांसाठी ही एक लोकप्रिय निवड असल्याचे सिद्ध झाले आहे. बाजाराच्या दृष्टीकोनातून, नेक्सॉन ईव्ही आणि झेडएस ईव्ही यांच्यात स्पर्धा आहे.
ड्रूम विश्लेषणानुसार, झेडएस ईव्ही’चे पुनर्विक्री मूल्य त्या किंमत श्रेणीतील इतर प्रतिस्पर्धी एसयुव्हीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ह्यूंदाई क्रेटा, किया सेलटॉस, टाटा नेक्सॉन आणि ह्यूंदाई कोनासारख्या सेगमेंटमधील इतर वाहनांशी तुलना केली असता, एमजी झेडएस ईव्ही त्याच्या तत्काळ टॉर्क आणि कमाल १७७ पीएस पॉवर आउटपुटसह आघाडीवर आहे, यामुळे कारला मदत होते. ८ सेकंदात ० ~ १०० पर्यंत सहज मजल मारता येते. एमजी झेडएस ईव्ही हे सेगमेंट डिफायिंग उत्पादन असून इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज आहे. जी १४१ हॉर्सपॉवर आणि २५३ एनएम टॉर्कची निर्मिती करते आणि ड्रायव्हिंगच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी तीन ड्रायव्हिंग पर्याय (इको, नॉर्मल आणि स्पोर्ट) सह येते.
एमजी झेडएस ईव्ही हे त्याच्या विभागातील एक अपवादात्मक वाहन आहे. ज्यामध्ये प्रभावी कामगिरी, उच्च श्रेणी आणि आलिशान अंतर्गत सजावटीमुळे भारतातील आतापर्यंतची सर्वात प्रशंसनीय ईव्ही बनली आहे. त्याची शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर जलद वेग, गुळगुळीत आणि शांत सफर घडविते, तर इलेक्ट्रिक पॉवरट्रेन उच्च कार्यक्षमता आणि खूप चांगले मायलेज देते. याव्यतिरिक्त, झेडएस ईव्हीची रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम ब्रेकिंगमधून ऊर्जा मिळवते आणि तिचे रूपांतर विजेत करून तिच्या एकूण कार्यक्षमतेत योगदान देते.