डॉ. नीलिमा राजूकर यांचा कोची येथे सन्मान

38
Dr. Neelima Rajukar honored in Kochi

पुणे : इंडियन सोसायटी ऑफ अनॅलिटीकल सायंटिस्टच्या (आयएसएएस) वतीने कोची येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडियन अनालिटिकल सायन्स काँग्रेस २०२३’मध्ये पुण्यातील डॉ. निलीमा राजुरकर यांचा तिहेरी सन्मान करण्यात आला.

या परिषदेमध्ये डॉ. राजूरकर यांना ‘मानद फेलोशिप’, उत्कृष्ट संघ नेतृत्वगुण व वर्षभरात चॅप्टरच्या माध्यमातून केलेली उल्लेखनीय कामगिरी यासाठी ‘आयएसएएस एक्सलन्स अवॉर्ड’ व पदक असे तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आयएसएएस पुणे चॅप्टरला ‘बेस्ट चॅप्टर’ पुरस्कार देण्यात आला.

‘रोल ऑफ मॉडर्न अनालिटिकल टेक्निक्स इन क्वालिटी कंट्रोल ऑफ आयुर्वेदिक भस्म’ या विषयावर त्यांचे परिषदेत व्याख्यान झाले. डॉ. राजुरकर यांच्या पुढाकारातून ‘आयएसएएस’ पुणे चॅप्टरची स्थापना ऑक्टोबर २०२१ मध्ये झाली.डॉ. निलीमा राजुरकर ‘आयएसएएस’ पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा आहेत. डॉ. अविनाश कुंभार सचिव, डॉ. अनुपा कुंभार सहसचिव, डॉ. सुनील हांडे खजिनदार, तर डॉ. मनीषा बोरा सहखजिनदार आहेत.