पुणे, १८ सप्टेंबर २०२३ : डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये १० वर्षांपासून वेदनादायी हर्नियाच्या आजाराशी झगडत असलेल्या पुण्यातील एका ५६ वर्षीय व्यक्तीवर रोबोटिक असिस्टेड अंबिलीकल हर्निओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. पॅरा अम्बालिकल हर्निया साधारण ६ सेमी एवढा मोठा होता, परंतु रोबोटिक असिस्टेड अंबिलीकल हर्निओप्लास्टी शस्त्रक्रियेमुळे हे सहज शक्य झाले. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २ दिवसातच रुग्णाला घरी सोडण्यात आले. रुग्ण आता पूर्णपणे बरा असून सामान्यपणे जीवन जगत आहेत.
ही शस्त्रक्रिया डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये डॉ. विनायक क्षीरसागर, वरिष्ठ लॅप्रोस्कोपिक शल्यचिकित्सक व तज्ञ डॉक्टरांच्या टीमने योग्य नियोजन करून यशस्वीपणे पार पाडली. पॅरा अंबिलीकल हर्निया साधारण ६ सेमी एवढा मोठा होता, त्यामुळे त्यावर उपचार करणे अतिशय अवघड होते. हि एक रोबोटिक हर्निओप्लास्टी शस्त्रक्रिया होती त्यामुळे वैद्यकीय सहाय्यकाच्या मदतीने केवळ रोबोटचा वापर करून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णावर कमी वेदना, चांगले आयुष्य आणि शस्त्रक्रियेनंतर लवकर ठीक होण्यासाठी, आम्ही त्यांच्या कुटुंबियांना रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याबद्दल समजावून सांगितले. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे, जिथे पोहोचू शकत नाहीत तिथे सुद्धा व्यापक प्रमाणात दृश्य दिसते त्यामुळे शस्त्रक्रिया करणे सुलभ होते. आणि हाच रोबोटिक शस्त्रक्रियेचा मुख्य फायदा आहे. या शस्त्रक्रियेस ४ तास लागले. रोबोटिक असिस्टेड अंबिलीकल हर्निओप्लास्टी शस्त्रक्रियेमध्ये रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. ह्या शिवाय पारंपारीक शस्त्रक्रियेमध्ये रुग्णांच्या उपचाराला बराच वेळ लागतो.
डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाल्या, “आम्ही डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये रुग्णांवर योग्य वैद्यकीय उपचार आणि त्यांचे चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अंबिलीकल हर्निओप्लास्टी ही एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. तरीही आमच्या अत्याधुनिक सुविधा आणि डॉक्टरांच्या वैद्यकीय कुशलतेमुळे रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास मदत झाली.”
डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, यांनी टिप्पणी केली की, “या क्लिष्ट आजारातून रुग्णाचे जीव वाचवल्याबद्दल शस्त्रक्रियेमध्ये सहभागी डॉक्टरांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आम्ही नेहमीच पारंपरिक शास्त्रक्रियेसोबतच आधुनिक वैद्यकीय उपचारांना नेहमीच प्रोत्साहन देतो. अशा यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नागरिकांसाठी आरोग्य सेवा आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे.”
डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालय, पिंपरी, पुणे म्हणाल्या, “आम्ही एका रुग्णाला कमी वेळात अचूक शस्त्रक्रिया करून त्यांना चांगले जीवन देण्यात यशस्वी झालो हे सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे. आणि ही रोबोटिक असिस्टेड अंबिलीकल हर्निओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या त्या डॉक्टरांचे मी अभिनंदन करते.”
डॉ. विनायक क्षीरसागर, वरिष्ठ लॅप्रोस्कोपिक शल्यचिकित्सक, डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालय, पिंपरी, पुणे म्हणाले, “या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला ६ सेमी एवढा मोठ्या आकाराचा हर्निया असल्याने प्रचंड वेदना होत होत्या. आणि ते दिवसेंदिवस वाढत चालले होते ज्यामुळे त्यांना वारंवार पोटात दुखणे व उलट्या होत होत्या. रुग्णाला ऑगस्ट महिन्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या योग्य त्या वैद्यकीय चाचण्या आणि तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर रोबोटिक असिस्टेड अंबिलीकल हर्निओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे त्यांना शास्त्रक्रियेनंतर थोड्याच वेदना झाल्या. आणि त्यानंतर फक्त २ दिवसातच घरी सोडण्यात आले. आता ते सामान्यपणे जीवन जगत असून, हर्नियाची शस्त्रक्रिया असल्यामुळे आम्ही त्यांना २ ते ६ आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.”