पुणे २३ नोव्हेंबर २०२२ : डसॉल्ट सिस्टिम्सने (Dassault Systèmes) (Euronext Paris: FR0014003TT8, DSY.PA) आज भारतातील अभियांत्रिकी, डिझाइन व तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी प्रॉडक्ट डिझाइन स्पर्धा आकृती २०२२ (AAKRUTI 2022) ची घोषणा केली. संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना दीर्घकालीन समस्यांच्या निराकरणासाठी आणि तंत्रज्ञान व सामाजिक अशा दोन्ही भावी आव्हानांचे निर्मूलन करण्यासाठी नवोन्मेष्कारी उपाय सादर करण्याची संधी देण्याचा आकृती २०२२ चा मनसुबा आहे. या स्पर्धेमध्ये तीन टप्पे आहेत – उत्पादन डिझाइन तयार करणे, डिझाइन संकल्पना सबमिशन आणि अंतिम उत्पादन सबमिशन, ज्यादरम्यान सहभागी क्लाऊड-आधारित ३डीएक्स्पेरिअन्स प्लॅटफॉर्म (3DEXPERIENCE platform) द्वारे सक्षम ऑनलाइन सहयोगाच्या माध्यमातून व्हर्च्युअली प्रकल्पाची निर्मिती करतील.
· शैक्षणिक संस्था व उद्योगांदरम्यान पोकळी भरून काढण्याच्या उद्देशाने डसॉल्ट सिस्टिम्सने देशव्यापी प्रॉडक्ट डिझाइन कॉम्पीटिशन आकृती २०२२ ची घोषणा केली
· डसॉल्ट सिस्टिम्सच्या 3DEXPERIENCE Works, SOLIDWORKS and 3DEXPERIENCE platform च्या माध्यमातून भारतातील विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता, समस्या निवारण व उद्योजकता दाखवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होतील
· विद्यार्थ्यांना डसॉल्ट सिस्टिम्ससोबत काम करण्याची आणि जवळपास ३ लाख रूपयांपर्यंत रोख बक्षीसे जिंकण्याची संधी
आकृती २०२२ मध्ये संपूर्ण भारतातील २३ राज्यांमधून एकूण ५०३८ स्पर्धक असतील. या स्पर्धेत ३०२ महाविद्यालये आणि १३८४ संघ सहभागी होणार असून त्यापैकी १४३ संघ सर्व मुलींचे संघ आहेत. या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना डसॉल्ट सिस्टिम्सच्या 3DEXPERIENCE Works, SOLIDWORKS and 3DEXPERIENCE platform द्वारे ऑफर केलेले नवीनतम तंत्रज्ञान आणि ट्रेंडची माहिती मिळेल.
“डसॉल्ट सिस्टिम्स तरुण विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान व विज्ञानाबद्दल रूची आणि उत्साह वाढवण्याप्रती कटिबद्ध आहे. त्यांच्या रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी कौशल्ये विकसित करते आणि अनुभवावर आधारित शिक्षणासह शिक्षणातील नाविन्यपूर्णतेला चालना देते,” असे भारतातील डसॉल्ट सिस्टिम्सचे व्यवस्थापकीय संचालक दीपक एन.जी. म्हणाले. 3DEXPERIENCE platform विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण आणि सोल्यूशन-बिल्डिंग अनुभव वाढविण्यात मदत करू शकते. आम्हाला विश्वास आहे की, योग्य कौशल्ये निर्माण करण्यासाठी आणि भविष्यातील कार्यबल तयार करण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल आहे. आकृती २०२२ स्पर्धकांना अनुभवाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शोधण्यात मदत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.’’
आकृती २०२२ मध्ये पाच वैशिष्ट्यपूर्ण थीम्स आहेत, ज्या विद्यार्थ्यांना नवकल्पनांना आत्मसात आणण्याची मुभा देतील:
· चांगले आरोग्य आणि स्वास्थ्य: परवडणारे, ऊर्जा-कार्यक्षम, हाताळण्यास योग्य आणि स्थिर अशा सोल्यूशनसह वास्तविक क्लिनिकल गरजा पूर्ण करणाऱ्या उत्पादनांचा विकास. विद्यार्थ्यांनी परवडणारी, पोर्टेबल आणि वापरण्यास सुलभ सानुकूलित वैद्यकीय उपकरणे डिझाइन करणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, विद्यार्थी विद्यमान वैद्यकीय उपकरणे शाश्वत उत्पादनांमध्ये पुन्हा डिझाइन करू शकतात.
· परवडणारी आणि शुद्ध ऊर्जा: या थीमचा उद्देश सर्वांना परवडणारी, विश्वासार्ह, टिकाऊ आणि आधुनिक ऊर्जा उपलब्ध असण्याची खात्री घेण्याचा आहे. विद्यार्थी विकसनशील देशांसाठी ऊर्जा सेवा डिझाइन, विस्तार आणि अपग्रेड करू शकतात.
· शाश्वत शहरे: विद्यार्थी सुरक्षित आणि परवडणारी गृहनिर्माण प्रणाली किंवा परवडणारी आणि टिकाऊ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था डिझाइन करू शकतात. या थीमचे उद्दिष्ट शहरांना नैसर्गिक संसाधनांचा कमीत-कमी वापर करण्यास मदत करणारे उत्पादन डिझाइन करणे हा आहे.
· जबाबदार वापर आणि उत्पादन: कापणीनंतरच्या नुकसानासह उत्पादन आणि पुरवठा साखळीतील अन्नाचे नुकसान कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अन्न नासाडी कमी करणारे किंवा कापणीचा अपव्यय कमी करणारे उत्पादन डिझाइन करणे आवश्यक आहे.
· पाण्याखालील जीवन: पाण्याकडे जगासमोरील पुढचे मोठे आव्हान म्हणून पाहिले जात असताना, विद्यार्थ्यांनी पाण्याचा वापर इष्टतम करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत आणि घरे, उद्योग, शेती व सार्वजनिक ठिकाणी जलप्रदूषण कमी करण्यास मदत होईल, असे उपाय शोधले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपकरणे डिझाइन करणे आवश्यक आहे, जी पाण्याचे संवर्धन करण्यास, पाण्याखालील जीवनाचे रक्षण करण्यास, जल प्रदूषण टाळण्यास किंवा पाण्याचे साठे स्वच्छ करण्यास मदत करू शकतात.
डसॉल्ट सिस्टिम्सचे 3DEXPERIENCE platform हे एक सहयोगी वातावरण आहे, जे व्यवसाय व लोकांना पूर्णपणे नवीन मार्गांनी नवनिर्मिती करण्यास आणि आभासी अनुभव वापरून उत्पादने व सेवा तयार करण्यास सक्षम करते. 3DEXPERIENCE platform व्यवसायाच्या कृती आणि इकोसिस्टमचे वास्तविक दृश्य देते, लोक, संकल्पना व माहिती एकत्र करते, सहभागी असलेल्या प्रत्येकास परस्परसंवाद साधण्याची आणि एकत्र काम करण्याची सुविधा देते. व्यवसाय एकसंधीपणे प्रत्यक्षात उत्पादन किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी संकल्पनेपासून ते मार्केट डिलिव्हरी व वापरापर्यंत नवीन अनुभवांची रचना आणि चाचणी करू शकतात.