ट्रान्सयुनियन सीबीलचे अध्यक्ष म्हणून व्ही अनंतरामन यांची नियुक्ती

70

मुंबई,: भारतातील अग्रगण्य इनसाइट आणि माहिती कंपनी ट्रान्सयुनियन सीबीलने आज बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून श्री. व्ही अनंतरामन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. ट्रान्सयुनियन सीबीलला ग्राहक, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेच्या लाभासाठी क्रेडिट रिपोर्टिंग आणि आर्थिक समावेशनात मदत करण्यासाठी उत्कृष्ट नेतृत्व प्रदान करत अकरा वर्षांहून अधिक काळ अध्यक्षपदी असलेल्या श्री. एम.व्ही. नायर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

अनंतरामन हे एक उद्योग क्षेत्रातील दिग्गज असून त्यांना स्टँडर्ड चार्टर्ड बँक, क्रेडिट सुईस, डॉईश बँक आणि बँक ऑफ अमेरिका यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट आणि गुंतवणूक बँकिंग टीमचे नेतृत्व करत वित्तीय सेवा क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. महत्त्वपूर्ण प्रशासकीय जबाबदारीसह त्यांनी भारत आणि सिंगापूरमध्ये जागतिक आणि प्रादेशिक नेतृत्वाची भूमिका पार पाडली आहे. ते ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट (पूर्वीचे सीडीसी) या यूकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशनचे वरिष्ठ सल्लागार देखील होते. ते इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, अॅक्सिस अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड आणि इकॉम एक्सप्रेस लि.च्या मंडळांवर काम करतात. ते ग्राहक आणि आरोग्यसेवा केंद्रीत मिड मार्केट खाजगी इक्विटी फर्म असलेल्या लाइटहाऊस फंड्सचे सल्लागार देखील आहेत. अनंतरामन यांनी XLRI मधून व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका आणि जदावपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे.

आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना अनंतरामन म्हणाले, “ट्रान्सयुनियन सीबीलने भारतभरातील ग्राहकांना कर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. क्रेडिट संस्थांना अधिक माहितीपूर्ण कर्ज निर्णय घेण्यास सक्षम केले आहे आणि रिटेल आणि एमएसएमई क्रेडिटच्या शाश्वत वाढीला पाठबळ दिले आहे. भारताच्या आर्थिक परिसंस्थेतील एक महत्त्वाची आणि मुख्य संस्था असलेल्या भारतातील अग्रगण्य क्रेडिट माहिती कंपनीच्या जडणघडण आणि विकासात भर घालण्यास मी उत्सुक आहे.”

“एक दशकाहून अधिक काळ ट्रान्सयुनियन सीबीलने लाखो लोकांसाठी आर्थिक संधी, उत्तम अनुभव आणि वैयक्तिक सक्षमीकरण निर्माण करण्यात मदत करणाऱ्या उपायसुविधा पुरविल्या आहेत. अनंतरामन यांचा विविध क्षेत्रांमधील समृद्ध अनुभव आणि कौशल्य आगामी काळात विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक दूरदर्शी दिशा प्रदान करेल,” असे ट्रान्सयुनियन सीबीलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश कुमार म्हणाले. “भारतातील लोकांची सेवा करण्यासाठी ट्रान्सयुनियन सीबीलमध्ये विकास आणि नवकल्पना राबविण्यास मदत केल्याबद्दल मी श्री. नायर यांचे नेतृत्व आणि बांधिलकी याविषयीही कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो,” असेही ते म्हणाले.

गेल्या दशकभरात ट्रान्सयुनियन सीबीलने ने क्रेडिट संस्थांना ४८ कोटींहून अधिक ग्राहक आणि ३ कोटी व्यावसायिक संस्थांना कर्ज उपलब्ध करून देण्यात मदत केली आहे. वित्त संस्थांना माहितीपूर्ण क्रेडिट निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी डेटा आणि योग्य माहिती पुरवून भारतातील कर्जव्यवस्थेला मदत केली आहे. यामुळे शाश्वत पत वाढ, प्रगत आर्थिक समावेशन आणि भारतातील व्यवसाय सुलभता सुधारण्यास मदत झाली आहे.