सातारा, महाराष्ट्र : २५ वर्षां च्या अनुभवासह आर्थिक नियोजनात अग्रगण्य कंपनी एल.एम.एन. कन्सल्टंट याना हे सांगायला अभिमान वाटतोय की, निलेश लाहोटी हे मानाच्या टॉप ऑफ द टेबल (टीओटी) २०२४ साठी पात्र ठरले आहेत तर मनीष लाहोटी हे मिलियन डॉलर राउंड टेबल (एमडीआरटी) २०२४ साठी पात्र ठरले आहेत. या कामगिरीमुळे ते जगातल्या टॉप १% आर्थिक सल्लागारांपकी एक झाले असून त्यांचं कौशल्य व त्यांच्या उत्कृष्ट कार्याची ही पावती आहे.
१९९६ ला कम्पनी सुरु केल्यापासून निलेश व मनीष हे दोघेही भाऊ सातत्याने एमडीआरटी साठी पात्र ठरत आहेत आणि यावर्षी टीओटी साठी वर्षा च्या पहिल्या ३ महिन्यांतच पात्र होऊन त्यांनी नवीन पर्व सुरु केलं आहे. “टीओटी २०२४ व एमडीआरटी २०२४ साठी पात्र होणंही आमच्यासाठी आनंदाची व सन्मानाची बाब आहे” असे निलेश लाहोटी म्हणाले. “ही आमच्या टीमच्या कष्टाची व जिद्दीची पावती आहे. आर्थिक ध्येयांबाबत आमच्यावर वि श्वास ठेवणाऱ्या सर्व ग्राहकांचेव एलआयसी स्टाफचेआम्ही ऋणी आहोत.” सिनियर बिझनेस असोसि एट अनिल बाबर यांच्या मोलाच्या सहकार्या बद्दल एलएमएन कन्सल्टंट यांनी विशेष आभार मानले. तसेच एलआयसी स्टाफ वि शेषतः सातारा वि भागातील स्टाफ यांचं निलेश व मनीष लाहोटी यांच्या कामगिरीमध्ये मोलाचे योगदान आहे. “आमची उत्तम टीम, ग्राहक आणि एलआयसी स्टाफ यांच्याशिवाय आम्ही हे यश साध्यच करू शकलो नसतो” असे मनीष लाहोटी म्हणाले.
“आम्ही ग्राहकांना आर्थिक नियोजना बाबतीत सर्वोत्तम सेवा देण्याकरिता बांधील राहू तसेच भारतातील टॉप आर्थिक नियोजन करण्यापैकी एक राहण्यासाठी प्रयत्नशील राहू.” एलएमएन कन्सल्टंट ही एक उत्कृष्ट आर्थिक नियोजन सेवा देण्याला समर्पित कम्पनी आहे. एलआयसीसोबत काम करण्यात व विविध आर्थिक सेवा जसंकी लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, इ. मध्ये एलएमएन कन्सल्टंट कुशल आहेत.
हेही वाचा :