मुंबई, २६ जून २०२३: ड्यूराशाईनला (DURASHINE®) ग्राहकांनी एकमताने “ब्रँड ऑफ द इयर २०२३” म्हणून निवडले आहे. मार्क्समेन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडने केलेल्या ग्राहक सर्वेक्षणावर आधारित संशोधनामार्फत ही निवड करण्यात आली आहे.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचा ड्यूराशाईन हा संपूर्ण भारतभरात कलर कोटेड स्टील शीट उत्पादने, सेवासुविधा पुरवणारा रिटेल क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड आहे. ड्यूराशाईनने उत्पादन विकास व ग्राहक सेवेमध्ये सर्वोच्च मानके प्रदर्शित केली आहेत. गेल्या पंधराहुन अधिक वर्षांपासून हा ब्रँड लक्षणीय कामगिरी बजावत असून, ग्राहककेंद्री, अभिनव उत्पादने, सेवासुविधा प्रदान करत आहे. ५००० पेक्षा जास्त टचपॉइंट्स निर्माण करून चॅनेल पार्टनर्सचे सर्वात विशाल नेटवर्क उभारून ड्यूराशाईन ब्रँडने आपल्या क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवले आहे.
‘ब्रँड ऑफ द इयर २०२३’ पुरस्कार मिळाल्याबद्दल टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अनूप कुमार त्रिवेदी यांनी सांगितले, “ड्यूराशाईन हा आमचा प्रमुख ब्रँड असून कलर कोटेड स्टील उत्पादन क्षेत्रात कॅटेगरी लीडर हे आपले स्थान या ब्रँडने एक दशकाहून अधिक काळापासून कायम राखले आहे. ग्राहकांना हा ब्रँड अतिशय आवडतो आणि ते या ब्रँडला प्राधान्य देत असल्याचे या पुरस्काराने सिद्ध केले आहे. आमच्यासाठी हा अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे, या पुरस्कारामुळे आम्हाला सर्व स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, नवी उत्पादने सादर करणे असो किंवा चॅनेल विकास किंवा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे असो, सर्वच बाबतीत उत्तम कामगिरी करून दाखवण्याची प्रेरणा या पुरस्काराने आम्हाला दिली आहे.”
ड्यूराशाईन हा टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचा प्रमुख रिटेल ब्रँड आहे. छत व भिंतींसाठीची सोल्युशन्स म्हणून कलर कोटेड स्टील हा ब्रँड पुरवतो. रोल फॉर्म्ड कलर कोटेड स्टील रूफ व वॉल शीट्स, स्ट्रक्चरल उत्पादने आणि ऍक्सेसरीज हा ब्रँड तयार करतो व त्यांची विक्री देखील करतो. निवासी, व्यापारी आणि औद्योगिक वापरासाठी सुबक, आकर्षक, सर्वोच्च दर्जाची व दीर्घकाळपर्यंत टिकणारी रुफिंग सोल्युशन्स ड्यूराशाईन ब्रँड पुरवतो. २००८ साली सुरु करण्यात आलेल्या या ब्रँडने आजवर अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि या क्षेत्रातील हा ग्राहकांकडून सर्वाधिक प्राधान्य दिला जाणारा ब्रँड आहे.